
कोपरगाव प्रतिनिधी:-
जिल्हा परिषद सदस्या सौ सोनाली ताई रोहमारे यांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न
पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधीनिस्त असणाऱ्या रुग्ण कल्याण समितीची बैठक आज दिनांक १०/०३/२०२१ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.मागील वर्षी निर्माण झालेल्या कोरोनाच्या परीस्थीतीमुळे तसेच त्याला अनुसरुन असणाऱ्या निर्बंधांमुळे बैठक घेण्यात आलेली नव्हती.
त्यामुळे आज रोजी ही बैठक घेण्यात आली. बैठकीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असणाऱ्या ६ उपकेंद्रांचा तसेच २२ गावांचा आर्थिक ताळेबंद अध्यक्षांचा समोर मांडण्यात आला. यादरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रास भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत अध्यक्षांनी माहिती जाणून घेतली. उदा -चतुर्थ श्रेणी कर्मचारी. साफसफाई उपलब्ध निधी, खर्च झालेला निधी,राखीवा निधी इ.तसेच त्यांनी समस्या सोडवण्यासाठी योग्य त्या सूचना दिल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांना मिळणाऱ्या निधीबाबत तसेच या उपकेंद्रां द्वारे त्या गावातील लोकांना जागेवरच म्हणजे त्याच गावात आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून ज्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे. त्या उपस्थित सर्व समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची अध्यक्षांना ओळख करून देण्यात आली. अध्यक्षांकडून त्यांच्या कामकाजाबाबत चौकशी करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्रा अधिनस्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना (ए एन एम आणि एम पी डब्ल्यू) भेडसावणाऱ्या विविध समस्या अध्यक्षांनी जाणून घेतली. कर्मचाऱ्यांनी सुद्धा उपकेंद्राच्या इमारतीबाबत असणा-या समस्या अध्यक्षां समोर मांडल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील ऑपरेशन थिएटर सुरू करण्याबाबत विविध सूचना अध्यक्षांकडून आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी पोहेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणाऱ्या सर्व ए एन एम यांनी मिळून महिला दिनानिमित्त अध्यक्षांचा सत्कार केला या बैठकी दरम्यान तालुका आरोग्य अधिकारी विधाते सर यांच्याकडून कर्मचाऱ्यांना तसेच आरोग्य अधिकाऱ्यांना विविध सूचना देण्यात आल्या. कर्मचाऱ्यांनीही आपल्या अडचणी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या समोर विस्तृतपणे मांडल्या.
बैठकीच्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येणारे बहुतांश कर्मचारी, तसेच समुदाय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीला अध्यक्ष मॕडम यांच्या व्यतिरिक्त पंचायत समिती सदस्य बाळासाहेब राहणे, समिती सदस्य रोहिदास होन, वाल्मीक नवले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बैठकीचे नियोजन ठरवण्यापासून ते बैठक संपन्न होण्यापर्यंत आरोग्य अधिकारी नितीन बडदे सर यांचे अमूल्य मार्गदर्शन सर्वांना मिळाले.
