
कोपरगाव प्रतिनिधी:- ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ फायर सेफ्टी अँड बिजनेस मॅनेजमेंट या संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन झालेल्या कार्यक्रमात 26/11 च्या नरीमन हाऊस कारवाईत प्रत्यक्ष सहभागी असणारे कोपरगाव चे भूमिपुत्र कमांडो विकास मुळेकर यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशसेवा करतांना आलेले चित्तथरारक अनुभव त्यांनी विध्यार्थ्यांना कथन केले.
ग्लोबल इन्स्टिट्यूट या संस्थचे संचालक अशोक कानडे सर व सागर पोटे सर यांनी संस्थेच्या वतीने कमांडो विकास मुळेकर यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

कमांडो मुळेकर यांनी बोलतांना मी सामान्य गरीब कुटुंबातील असुन कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका माझी जन्मभूमी आहे भारतीय लष्करात सेवा करण्याचे माझे तसेच माझ्या आई वडिलांचे स्वप्न होते ते पुर्ण झाल्याने मी आज समाधानी आहे निवृत्ती नंतर विविध माध्यमातून यापुढेही मी देशाची सेवा करीतच राहील असे सांगत कोणत्याही क्षेत्रात जिद्दीने व चिकाटीने कार्य करीत राहिल्यास निश्चितच यश मिळते असे सांगुन भारतीय लष्करात सेवा देत असतांना मला जम्मु काश्मीर ,राजस्थान, पंजाब सह देशाच्या विविध भागात जाऊन सेवा करण्याची संधी मिळाली त्या प्रत्येक संधीचे सोने करण्यासाठी प्रतिकुल परिस्थितीत जिवाची बाजी लावून यशस्वीपणे कर्तव्य बजावले हे मी माझे भाग्य समजतो.
मुंबई येथे 26/11चा अतिरेकी हल्ला झाल्यावर आदेश मिळताच त्या मोहिमे साठी आम्ही रातोरात मुंबई कडे रवाना झालो त्या काळ्या दिवसाची आजही आठवण येते आमच्या तुकडीने हेलिकॉप्टर द्वारे बिल्डिंग टेरेसवर उतरून अतिरेक्यांना शोधुन कंठस्नान घालुन ती मोहीम यशस्वी होण्यासाठी आमच्या तुकडीतील जवानांनी जिवाची बाजी लावून यश मिळवले याचा एक सैनिक म्हणुन मला सार्थ अभिमान आहे मात्र आमच्या तुकडीतील एक सहकारी कमांडो गजेंद्रसिंग शहीद झाले त्यांना या मोहिमेत प्राण गमवावे लागले तर आमचे अनेक सहकारी जखमी झाले याचे शल्य आजही मनात कायम आहे असे सांगतांना कमांडो विकास मुळेकर यांना गहिवरून आले होते.

यावेळी ग्लोबल कॉलेजमधील फायर सेफ्टीच्या विध्यार्थ्यांनी कमांडो मुळेकर यांना कमांडो प्रशिक्षण कसे असते किती खडतर असते याबाबत विविध प्रश्न विचारत माहिती घेतली भारतीय आर्मीच्या भरती प्रक्रिये संदर्भात माहिती करून घेतली कार्यक्रमाचे प्रास्तविक व सूत्रसंचालन अशोक कानडे यांनी केले तर आभार शिक्षिका प्रतीक्षा भोसले यांनी मानले यावेळी संचालक अनिल कानडे,अशोक कानडे ,सागर पोटे ,कार्तिक मालकर ,रामेश्वर कानडे यांचे सह विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
