नियमित व व्यक्तशीर परत फेड करण्यात सभासदांची शान:- चंद्रशेखर कुलकर्णी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव तालुक्यातील मौजे धामोरी येथील पंडीतराव कुलकर्णी ग्रामिण बि.शेती सह. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थचे चेअरमन राजेंद्र माधवराव वाईकर यांचे अध्यक्षतेखाली व कर्मवीर शंकरराव काळे सह.साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर मोहनीराज कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली.याप्रसंगी प्रमुख भाषणात बोलताना चंद्रशेखर कुलकर्णी यांनी लोकनेते स्व.पंडीतराव कुलकर्णी यांचे नावाने सन २००० मध्ये स्थापन केलेली संस्था आज प्रगतीपथावर आहे. संस्थेमार्फत गावातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना शेतकऱ्यांना, दुधव्यावसायिकांना,लघु व्यवसायासाठी व शेती पुरक जोडधंद्यासाठी चांगल्या प्रकारे कर्ज वितरण,कर्जदार व ठेवीदारांना विनम्र व तत्पर सेवा दिली जात आहे.संस्थेला चालु वर्षी ३.५० लाख रु. नफा झाला आहे.संस्था सन २०२५ मध्ये रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत असुन संस्थेचा त्यानिमित्त सदर वर्षी सभासदांना चांदीचे नाणे भेट स्वरुपात देण्याचा संस्थेचा मानस आहे.कोराना काळात संपुर्ण जगात विषाणु जन्य आजाराने थैमान घातलेले असताना अडचणीच्या प्रतिकुल परिस्थितीतही संस्थेने एन.पी.ए.,सी.आर.ए.आर,सी.डी.रेशिओचे प्रमाण आदर्श राखलेले आहे.सेवकांना दिपावली निमित्त २ महिन्याच्या पगाराइतका बोनस दिला जाणार असुन संस्थेमार्फत सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात कर्ज घेऊन वेळेवर संस्थेचे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या सभासदाना प्रोत्साहन मिळावे म्हणुन संस्थेकडुन व्याजावर १% रिबेट व थकित कर्जाची एकरकमी परतफेड करणा-या सभासदांस पूर्ण मुद्दल व्याजासह व इतर आवश्यक वसुल करावयाच्या रक्कमेवर संस्थेच्यावतीने २% सवलत दिली जाणार असल्याची घोषणाही त्यांनी या प्रसंगी केली याप्रसंगी प्रमुख भाषणात बोलताना चंद्रशेखर कुलकर्णी यांनी संस्था नावारुपास येण्यासाठी सभासद पदाधिकारी,संचालक कर्मचारी,ठेव संकलन प्रतिनिधी यानी केलेल्या योगदानाचा उल्लेख केला.नियमितपणे कर्जफेड करणारे कर्जदार सभासदांचीच संस्थाना गरज असून, राज्यातील बहुतांश सहकारी पतसंस्था वसुली अभावी अडचणीत आलेल्या आहेत.उत्तम कर्ज वसुली देण्यात सभासदांची शान असून कर्जवसुली हा सहकारी संस्थांचा आत्मा आहे.
अनेक सभासदांनी संस्थेच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. सभेस कोपरगांव तालुका रा.काँ.चे अध्यक्ष माधवराव खिलारी,गौतम बँकेचे माजी व्हा.चेअरमन पुडलिक माळी,बाबुराव दरेकर,अरुण भाकरे, चैतन्य कुलकर्णी, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक मनोज जगझाप, पतसंस्थेचे व्हा.चेअरमन सुनिल जगझाप, संचालक सुदामभाऊ गाडे,शामराव माळी भास्करराव वाघ,प्रा. संदिप जगझाप,सुभाष वाघ,प्रकाश लव्हाटे, पत्रकार निवृत्ती शिंदे, रविंद्र माळी,बबनराव वाणी,देवराम माळी माणिक सोमासे, अभिजीत उसरे,कैलास बारे व मोठ्या प्रमाणावर सभासद उपस्थित होते याप्रसंगी संस्थेचे मॅनेजर दिलीप खिलारी यांनी अहवाल वाचन केले. संस्थेचे माजी चेअरमन प्रा.नारायण बारे (सर) यांनी सुत्र संचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *