शेतकऱ्यांनी शासनाच्या भरवशावर शेती धंदा करू नये:- चंद्रशेखर कुलकर्णी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव तालुक्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या धामोरी वि.का.सेवा सह. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थचे व्हा.चेअरमन व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.नारायण गंगाधर बारे यांचे अध्यक्षतेखाली व कर्मवीर शंकरराव काळे सह साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रशेखर मोहनीराज कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात नुकतीच पार पडली.याप्रसंगी प्रमुख भाषणात बोलताना चंद्रशेखर कुलकर्णी यांनी स्व.पंडीतराव कुलकर्णी यांनी सन १९५० मध्ये स्थापन केलेली संस्था आज प्रगतीपथावर आहे.संस्थेमार्फत शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे कर्ज वितरण,सर्व प्रकारचे रासा.खताची विक्री,कृषी औषधाची विक्री व स्वस्त धान्य दुकान चालविले जाते. संस्थेला चालू वर्षी ७ लाख रु.नफा झाला आहे.संस्थेने गेली २५ ते ३० वर्षांची डिव्हिडंड वाटपाची परंपरा आजही सभासदांना शे. १०% लाभांश व सेवकांना २ महिन्याच्या पगाराइतका बोनस देऊन कायम राखली आहे.आपल्या संस्थेमार्फत सन २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात पिक कर्ज घेऊन वेळेवर संस्थेचे नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या सभासदाना प्रोत्साहन मिळावे म्हणून संस्थेकडुन १% रिबेट दिले जाणार असल्याची घोषणाही त्यांनी या प्रसंगी केली.प्रमुख भाषणात बोलताना चंद्रशेखर कुलकर्णी यांनी संस्था नावारूपास येण्यासाठी सभासद, पदाधिकारी व संचालक यांनी केलेल्या योगदानाचा उल्लेख केला.शासनाने सुरु केलेल्या योजना पुढे चालू राहतीलच असे नाही.शेतकऱ्यांनी शासनाच्या भरवशावर शेती धंदा करू नये त्यांनी स्वयंपुर्ण होणे गरजेचे आहे. नियमितपणे कर्जफेड करणारे शेतकरी कर्ज भरेनासे झाल्यामुळे राज्यातील बहुतांश सहकारी संस्था वसुली अभावी अडचणीत आलेल्या आहेत.याला धामोरी वि.का.सेवा सोसायटीही अपवाद नाही.कर्ज वसुली हा सहकारी संस्थाचा आत्मा असुन राज्यातील अनेक सह. संस्था शेवटच्या घटका मोजत आहेत.सह. संस्थाचे तोटे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या इंधनाचे भरमसाठ वाढलेले भाव,अनियमित वीज पुरवठा व अवाजवी इलेक्ट्रीक बिलाची सक्तीची वसुली या सर्व गोष्टीमुळे शेतकरी कर्जबाजारी,देशोधडीला लागलेला आहे. अशा प्रसंगी राज्यकर्त्यांची कर्जबाजारी शेतकन्यांना या चक्रव्युहातून बाहेर काढण्याची प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कमी दराने वीज, शेतीमालाला हमी भाव, डिझेल व खताचे वरील वाढलेला भाव कमी करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे, तर ख-या अर्थाने शेतकरी सुखी होईल, असे चंदशेखर कुलकर्णी यांनी सांगितले.
अनेक सभासदांनी संस्थेबद्दल गौरवास्पद भाषणे केली.माजी व्हा.चेअरमन बाबुराव दरेकर,आनंदराव वाघ, सहकारमहर्षी कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन कैलासराव माळी यांची समयोचित भाषणे झाली.सभेस कोपरगाव तालुका रा. काँ.चे अध्यक्ष माधवराव खिलारी,गौतम बँकेचे माजी व्हा.चेअरमन पुंडलिक माळी,चैतन्य कुलकर्णी,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक मनोज जगझाप,संस्थेचे संचालक अरुण भाकरे,देवराम माळी भाऊसाहेब खिलारी, दिलीपराव माळी माणिक सोमासे, अभिजीत उसरे भाऊसाहेब माळी, शरदराव पवार पतसंस्थेचे माजी चेअरमन सुदामभाऊ गाडे ,पंडीतराव कुलकर्णी पतसंस्थेचे चेअरमन राजेंद्र वाईकर, व्हा.चेअरमन सुनिल जगझाप,रामराव माळी भास्करराव वाघ,राजेद्र वाघ,सतिश कोळपे, पत्रकार निवृत्ती शिंदे, भाऊसाहेब मांजरे व मोठया प्रमाणावर सभासद उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव मनोज कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केले. संस्थेचे संचालक प्रा. संदिप जगझाप यानी सुत्र संचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *