
कोपरगाव प्रतिनिधी
(देवळाली प्रवरा):-
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा येथे वरखडे – नालकर वस्ती जवळील भंडारदरा धरणाच्या कालव्यावर प्रहार श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी येथीलच जेष्ठ नागरिक मच्छिंद्र सखाहरी वरखडे (मामा) यांचे हस्ते आज भूमपूजन केले.
प्रहार श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे मागणीवरून व जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे यांचे प्रयत्नातून माजी राज्यमंत्री मा. बच्चूभाऊ कडू यांनी देवळाली प्रवरा शहरासाठी कॅनॉल वरील तीन लोखंडी पुलासाठी तिस लक्ष व टाकलिभान येथील टेल टँक पाण्याच्या गेट साठी चाळीस लक्ष रूपये असा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी सत्तर लक्ष रुपयांचा निधी नुकत्याच मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंजूर केला आहे.
पैकी देवळाली प्रवरा येथिल मंजूर तीन पुलांपैकी काकडे – कदम – पठारे वस्ती येथिल दुसऱ्या पुलाच्या कामाचा नुकताच नारळ फोडून शुभारंभ करणेत आला. तर सांबारे – वाडकर वस्तीवरील पहिला पुल जवळ्पास तयार होऊन पूर्णत्वास आला आहे.
प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाच्या श्रीरामपुर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, प्रहार विधानसभा कार्यक्षेत्र कामगार सेलचे प्रमुख बाळासाहेब कराळे, देवळाली प्रवरा प्रहारचे शहर अध्यक्ष विजय कुमावत, उपाध्यक्ष शिवाजीराव मुसमाडे, राहुरी फॅक्टरी प्रहार शहर अध्यक्ष शरद वाळुंज, उपाध्यक्ष एकनाथ वाणी, गणेश भालके, संघटक प्रभाकर कांबळे, शाखा अध्यक्ष अमोल अंबिलवादे, प्रशांत कराळे, मच्छिंद्र सकारी वरखडे, जगन्नाथ सखारी वरखडे, संजय सावित्रा वरखडे, दिलीप चिमाजी वरखडे, भाऊसाहेब वरखडे, अभिजीत संजय नालकर, एकनाथ बाबासाहेब वरखडे, गणेश मंजाबापू वरखडे, राहुल महाकाळ, भाऊसाहेब आरंगळे, शिवाजी जालिंदर वरखडे, भाऊसाहेब टाकायची भोसले, संजय भाऊसाहेब वरखडे, योगेश दिलीप वरखडे, राहुल पांडे, दत्तात्रय गोरक्षनाथ वरखडे, संकेत अजित वरखडे, योगेश कारभारी वरखडे आदी मोठ्या संख्येने मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रसंगी बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस म्हणाले की, दि. २० जून २०२२ रोजीच्या आमच्या लेखी मागणी नुसार देवळाली प्रवरा शहर हद्दीत प्रत्येकी जवळ्पास १० लक्ष रुपये खर्च असलेले तीन लोखंडी पुलांना तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री मा. बच्चूभाऊ कडू यांनी तात्काळ मान्यता दिली. पैकी आज वरखडे मामा यांचे हस्ते तिसऱ्या पुलाचे भूमिपूजन करून कामास सुरुवात झाली आहे.
१४ जुलै २०२२ रोजी पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी मंजूर झालेल्या पुलांची आमचेसह प्रत्यक्ष जागेवर येवून पाहणी केली व तांत्रिक माहितीचा अहवाल वरिष्ठांना सादर केला होता.
पुढे बोलताना ढुस म्हणाले की, देवळाली प्रवरा येथील कदम – काकडे.., वरखडे – नालकर.., व सांबारे – वाडकर या तिन वस्ती जवळील नागरिकांना भंडारदरा धरणाच्या कॅनॉल वर ये जा करणेसाठी अत्यंत गैरसोय होत होती, पाटाला पाणी आल्यावर येथील शाळकरी मुलांना जवळपास एक ते दोन किलोमीटर वळसा घालून शाळेत जावे लागत होते.., पाटाच्या दुतर्फा राहणाऱ्या शेतकऱ्यांना जनावरांचा चारा पाटातून वाहतूक करणेसाठी मोठी सर्कस करावी लागे.., आणि जर पाटाला पाणी असेल तर खूप लांबून चारा वाहतूक करावी लागत असे.., दूध उत्पादक शेतकरी यांना दूध वाहतूक आणि वयोवृध्द नागरिकांची पाट ओलांडताना होणारी गैरसोय पाहता वरील तीनही वस्तीवरील नागरिकांच्या लेखी मागणीवरून आम्ही दि. २० जून २०२२ रोजी प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांचे मार्फत पाटबंधारे राज्यमंत्री मा. ना. बच्चूभाऊ कडू यांना निवेदन देऊन येथे तात्काळ लोखंडी पादचारी पूल करून मिळणेची मागणी केली होती.
नामदार बच्चूभाऊ कडू यांचे आदेशाने उपरोक्त ठिकाणी तात्काळ लोखंडी पूल बसवून देणेकामी कार्यवाही सुरू झाली असून आज येथिल जेष्ठ नागरिक वरखडे मामा यांचे शुभहस्ते वरखडे – नालकर वस्तीवर या देवळाली मधिल तिसऱ्या पुलाचे भूमिपूजन करून आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
आठ ते दहा दिवसांत एक या प्रमाणे तिन्ही पुलाचे काम पंधरा ते वीस दिवसात पूर्ण होणार असून त्यामुळे येथील शेतकरी, वयोवृद्ध नागरिक व शाळेत जाणारे विद्यार्थी यांची होणारी गैरसोय त्यामुळे दूर होण्यास मदत होणार असल्याचे ढूस यांनी सांगितले.
पन्नास वर्षांपासून आम्ही कॅनॉल ओलांडणेसाठी खूप हाल अपेष्टा सहन केल्या असून प्रहार आमचेसाठी धाऊन आल्याने आमचे सर्व कष्ट दूर झाल्याची उस्फूर्त प्रतिक्रीया या प्रसंगी येथील जगन्नाथ बाबासाहेब वरखडे यांनी व्यक्त करून प्रहार संघटनेचे सर्व सदस्य व आ. बचूभाऊ कडू यांचे आभार मानले.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रहार सदैव तत्पर असल्याचे सांगून या तीन पुलांचा प्रश्न तात्काळ मार्गी लावल्याबद्दल पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी यांचेसह प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीतदादा पोटे व नामदार बच्चूभाऊ कडू यांचे आप्पासाहेब ढुस यांनी प्रसंगी आभार व्यक्त केले.
