
कोपरगाव प्रतिनिधी:-
आजवर अनेक सत्तांतर झाली,काहींनी दिवसाआड पाणी दिलं, तर काहींनी आठ दिवसांआड, तर काहींनी रेशनवर, तर काहींनी २५ दिवसाआड.
गोदावरी नदी उशाला असतांना,हि विडंबना अविरत सुरू आहे.
एक काळ होता, जेव्हा रोज कोपरगावला पाणी यायचे,आणि नंतर पाण्यासाठी हंडा घेऊन बोरींग शोधत माता बहिणी फिरतांना हि आम्ही पाहिल्या आहे.
आज, उद्याची, जबाबदारी जनतेवर आहे. आपल्या मतांच्या ताकदीचा बडगा कधीतरी दाखवा, अमिषा च्या आगडोंबात जनता होरपळी आहे,म्हणुन विकासाची गती मंदावली आहे.
रस्ते, पाणी, विज, शिक्षण या मुलभुत सुविधेचा बोचबारा उडाला आहे, त्याचे परिणाम जनतेला भोगावे लागत असुनहि, अजुन जनतेचे डोळे उघडले नाही. यापेक्षा मोठं आश्चर्य ते काय असावं.
या विकासत्मक बाबी विकसनशील घटकांनाच कराव्या लागतात,
पण विकासाचे काम करण्यापेक्षा आरोप प्रत्यारोपाची जी क्षृंखला सत्तर वर्षांपासून चालु आहे. त्याची गुंतागुंत न सुटणारी आहे,आणि कधीच सुटणार हि नाही, कारण कोणालाच विकासात स्वारस्य नाही.
याचा अनुभव अनेकदा सर्वसामान्यांना आलेला आहे.विकासाच्या मुद्यावर विकसनशील घटकांनी जर प्रामाणिकपणे काम केले, तर निर्धारित वेळेत (५ वर्षाच्या आतच )विकास होऊ शकतो. पण आपल्याकडे सत्तर वर्षात वरील बाबींचा अभाव असल्याने, विकास होणं शक्य कदापी शक्य नाही.
याचे मुळ कारण अजुन हि वेगळंच आहे,अनेक विकास कामे हे विकसनशील घटकांच्या दिरंगाईमुळे च अडलेले आहे, श्रेय वादाच्या लढाईत बळी गेला आहे विकासाचा.
विकासाचे जाहिर नाम्यात मुद्दे छापुन न थांबता, त्यासाठी पद असो अथवा नसो मनापासुन झटले पाहिजे …
जे जाहिर नाम्यात विकासाचे मुद्दे छापतात, तेच त्यांच्या लक्षात नसते, काय केले या पेक्षा काय करायचे यावर काम होण महत्वाचं आहे.आणि ते आत्मियतेने झाले पाहिजे.
आपण छापलेल्या जाहिर नाम्यातील काम आपल्या कार्यकाळात कसे पुर्ण होतील, याकडे लक्ष पुरवुन विकास करून दाखवला पाहिजे, पण असं होतं नाही. अनेकदा कालावधी संपुन जातो,पण विकास कामाला वेग येत नाही, अनेक विकास कामे अनेकदा बारगळतातच, त्यामुळे आपल्याकडे अधोगती ची क्षृखंला कधीच थांबत नाही. आणि आणखी शंभर वर्ष थांबणार हि नाही .याची चाहुल मनाला नकळत लागते.

विकास काम सोडा, पण साध्या मुलभुत गरजांसाठी सामन्य नागरीकांना संघर्ष करावा लागतो,
यासाठी जनतेने जागृत होण्याची गरज असुन,
एका सुरात विकसनशील घटकांना विचारांयची गरज आहे,
आतातरी विकास कामाला वेग येऊ द्या…..
जयहिंद
