”के. जे. सोमैयातील सहा विद्यार्थ्यांची ICICI बँकेत अधिकारी पदावर निवड…”

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
येथील के.जे. सोमैया महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व प्लेसमेंट सेलच्यावतीने आयोजित कॅम्पस इंटरव्यूव्हच्या माध्यमातून मुंबई येथील नामाकिंत व आंतराष्ट्रीय नेटवर्क असलेल्या ICICI या बँकेच्या अधिकारी पदावर सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
महाविद्यालयाच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट सेलच्या वतीने वर्षभर विद्यार्थ्यांची तयारी करुन घेण्यात येते. विद्यार्थ्यांचे इंटरव्यु स्किल्स वाढवण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन प्लेसमेंट सेल मार्फंत करण्यात येते. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव हे सतत आग्रही असतात. या सेलचे प्रमुख प्रोफेसर डॉ. एस. आर पगारे व त्यांचे सहकारी डॉ. जी. के चव्हाण, डॉ. एन. टी. ढोकळे, डॉ. एस.बी. भिंगारदिवे हे सातत्याने विविध कंपन्यांशी संपर्क करुन विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देत असतात.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये केतन दहे, तेजस वाघमारे, विशाल रावले, प्रविण भोसले, अक्षय जावळे व हर्ष मालोकर यांचा समावेश आहे. या यशाबदद्ल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व सेलच्या कार्याबद्दल आनंद व्यक्त केला. संस्थेचे सचिव अॅड. एस.डी. कुलकर्णी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची माहिती घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे विश्वस्त मा. संदिपजी रोहमारे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस यादव यांच्या मार्गदर्शन व प्रोत्साहनामुळे हे यश प्राप्त झाल्याचे प्रोफेसर डॉ. एस. आर. पगारे यांनी नम्रपणे नमुद केले. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वागिंण विकासासाठी आम्ही प्रयत्न करत राहु अशी ग्वाही सेलच्या सर्व सदस्यांनी दिली. महाविद्यालयाच्या या यशाबद्दल समाजाच्या सर्व स्तरांमधून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *