के.बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर निवड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दि.14 सप्टेंबर 2024 रोजी शालेय जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धा मुले व मुली चे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव येथील 19 वर्षे वयोगटातील 05 मुले व 05 मुली अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी तलवारबाजी खेळातील विविध प्रकारात विजय प्राप्त केला आहे. या स्पर्धेतून एकूण 10 विद्यार्थ्यांची निवड पुणे विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेसाठी झाली आहे.अशी माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे यांनी दिली.
या खेळाडूंच्या यशाबद्दल को. ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे ,सचिव संजीव दादा कुलकर्णी ,प्राचार्य डॉ. व्ही. सी. ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे , महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे , वरिष्ठ महाविद्यालयाचे शा. शि. संचालक डॉ. सुनिल कुटे , क्रीडा शिक्षक श्री. मिलिंद कांबळे तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *