“जिल्हा ग्राहक मंच सुविधा तालुका स्तरावर व्हावी”:- अँड.नितीन पोळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
प्रत्येक नागरिकांना ग्राहक म्हणून अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते मात्र ग्राहक न्यायालय जिल्ह्याच्या ठिकाणी असल्या मुळे अनेक नागरिकांची फसवणूक होते त्यामुळे ग्राहक न्यायालयाची सुविधा तालुका स्तरावर उपलब्ध व्हावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी कोपरगाव तालुक्याचे आ आशुतोष काळे यांनी केली
आ आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव वकील संघाला सदिच्छा भेट दिली व वकिलांच्या समस्या जाणून घेतल्या या वेळी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष यांनी आ आशुतोष काळे यांच्या कडे जिल्हा ग्राहक मंच चे कामकाज तालुका स्तरावर सुरू करण्याची मागणी केली
शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना ग्राहक न्यायालयाशी संबंधित अनेक छोट्या मोठ्या तक्रारीना सामोरे जावे लागते मात्र ग्राहक न्यायालय (मंच) जिल्ह्याच्या ठिकाणी असल्या मुळे अनेक नागरीक फसवणूक होऊन देखील तक्रारी कडे दुर्लक्ष करतात त्यामुळे नागरिकांना (ग्राहकांना) फसवणूक होऊन देखील न्यायापासून वंचित राहावे लागते त्याच प्रमाणे या न्यायालयात ग्राहक स्वतः अर्ज करून फसवणुकी संदर्भात तक्रार करून आर्थिक व मानसिक त्रास झाल्याबाबत नुकसान भरपाईची मागणी करू शकतात मात्र जिल्हा स्तरावर ही सुविधा असल्याने,तसेच जिल्हा कार्यालय दूर असल्याने स्वतः ग्राहक व वकील देखील या कार्यालयामध्ये जाऊ शकत नाही त्यामुळे जिल्हा ग्राहक मंचची (न्यायालयाची) सुविधा तालुका स्तरावर उपलब्ध झाल्यास तालुक्यातील अनेक नागरिकांची ग्राहक म्हणून होणारी गैर सोय टाळता येऊ शकते त्या मुळे ही सुविधा तालुका स्तरावर उपलब्ध व्हावी अशी मागणी केली तर आ आशुतोष काळे यांनी या बाबत पाठपुरावा करू असे सांगितले असून ही सुविधा तालुका स्तरावर उपलब्ध झाल्यास तालुक्यातील नागरिकांना ग्राहक म्हणून फायदा होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *