

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक 30. 8.2022 कोपरगाव बस स्थानकामध्ये लहान मुलांना स्तनपान करण्यासाठी महिलांची स्वतंत्र व्यवस्था म्हणून असलेली हिरकणी कक्ष लहान मुलांना स्तनपान करण्यासाठी बांधलेली खोली कायमस्वरूपी बंद अवस्थेत असून आमच्या महिला भगिनींना होत असलेल्या त्रासाला सामोरे जावे लागते. ही गोष्ट वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सल्लागार शरद खरात त्याचप्रमाणे वंचित चे पदाधिकारी व महिला आघाडीच्या निदर्शनास आल्यामुळे महिलांसाठी असलेले हिरकणी कक्ष त्वरित चालू करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली. तसेच ग्रामीण भागातून शालेय शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना रोड रोमिओ व काही दुचाकी हुल्डबाजा पासून होणाऱ्या त्रासामुळे भीतीपोटी पालक वर्ग विद्यार्थिनींना शिक्षणाचा मार्ग कायमस्वरूपी बंद करताना तालुक्यामध्ये दिसत आहे. हे चित्र त्वरित थांबवावे व हुल्डबाज दुचाकी रोडरोमिओवर कडक कारवाई होऊन विद्यार्थिनींचा शिक्षणाचा मार्ग सोपा होण्यासाठी बस स्थानकात निर्भया पथकाची नेमणूक करावी. तसेच जुन्या बस स्थानकामध्ये महापुरुषांची तैलचित्रे लावलेली होती. ती त्वरित लावण्यात यावी अन्यथा हिरकणी कक्षा असो निर्भया पथक असो महापुरुषांची फोटो असो याआठ दिवसाच्या आत या मागण्या पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे बस स्थानकामध्ये आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनाचे पत्र आगार व्यवस्थापक चौधरी साहेब यांना देण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शरद खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच साईबाबा कॉर्नर चौवफुली या ठिकाणी कायम वाहतुकीची वरदळ असते त्यामुळे शालेय व महाविद्यालय विद्यार्थी, विध्यार्थीनी यांना ही आपला जीव धोक्यात घालून रस्ता ओलंडवा लागतो… त्यामुळे याठिकाणी दोन वाहतूक पोलीस नेमण्यात यावे… असं निवेदन 4.8.22 रोजी वंचीत च्या वतीने कोपरगाव पोलीस स्टेशनला देण्यात आले होते… त्या बद्दल स्मरण पत्र कोपरगाव चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब यांना हि निवेदन देण्यात आले.अन्यथा वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने साईबाबा कॉर्नर या ठिकाणी 8दिवसांनी रस्ता रोको अंदोलन करण्यात येईल. असे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर जिल्हा संघटक अनिल बनसोडे तालुका महासचिव राजेंद्र मोकळ,बाजीराव रनशूर,गैवतम पगारे,संजय त्रिभुवन, शिवाजी त्रिभुवन,नारायण पगारे, राजेंद्र पगारे,पैलवान साईनाथ जाधव, नानासाहेब जगताप, विजय जाधव, संजय कोपरे,विकास दुशिंग, नितीन बनसोडे, विनोद नेरे,शकील तांबोळी, वाल्मीक शिंदे, सचिन दाभाडे, संतोष मैंद,तसेच महिला आघाडीच्या सुनीता मनतोडे, सविता वाघ या पदअधिकाऱ्यांच्या सह्यां आहेत..
