जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन कोपरगाव कार्यध्यक्षपदी मुकुंदमामा काळे यांची वर्णी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली यांच्या नूतन पदाधिकारी निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असून कोपरगाव तालुका कार्यध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते व भाजपा दिव्यांग सेलचे अध्यक्ष मुकुंदमामा काळे यांची निवड झाली असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा प्राप्त होत आहेत.
समाजसेवेची आवड व तळमळ असणारे ग्रामीण भागातील असणारे मुकुंद काळे यांचा जनसंपर्क व लहान मोठ्यांमध्ये असलेला वावर विचारात घेऊन नगर जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव,ग्रामीण जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवने यांच्या शिफारसी नुसार राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष राजेंद्र आहेर,महासचिव राजेंद्र मोरे,कायदेशीर सल्लागार गजानन ठाकरे,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राम घरत व महाराष्ट्र प्रभारी वाल्मिक जाधव,कार्याध्यक्ष आप्पाजी शिरसाठ आदींनी सर्वानुमते मुकुंदमामा काळे यांच्या नावाला पसंती देऊन त्यांची कोपरगाव तालुका कार्याध्यक्ष म्हणून वर्णी लावली आहे.
स्वतः दिव्यांग असतांना इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचा काळे यांचा स्वभाव त्यांना ही जबाबदारी पार पाडताना कामी येईल व त्यांच्या माध्यमातून दुर्लक्षित व अन्यायग्रस्त बांधवांना मानवी अधिकार मिळण्यासाठी आणि हक्क मिळण्यासाठी या पदाचा लाभ होईल अशी प्रतिक्रिया त्यांच्या निवडीनंतर निवड कमिटीने दिली आहे.
संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक श्री.बिपीनदादा कोल्हे,भाजपा प्रदेश सचिव सौ.स्नेहलताताई कोल्हे व सहकार महर्षी कोल्हे कारखाना चेअरमन,जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *