विद्यार्थ्यांनी एखादि कला जोपासली पाहिजे:- रजनीताई गुजराथी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
विद्यार्थिनींनी जीवन जगताना, जीवनात आनंद, समाधान मिळविण्यासाठी गायन, वादन, संगीत, चित्रकला, रांगोळी कला अशांपैकी एखादी कला जोपासली पाहिजे . कोणतीही कला माणसाला आत्मसन्मान, समाधान देत असते असे विचार जेष्ठ लेखिका महिला मंचच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी यांनी व्यक्त केले.
कोपरगाव नगरपालिका शाळा नंबर तीन ( मुली ) शाळेतील विद्यार्थ्यीनींना जेष्ठ नागरिक सेवा मंच, जेष्ठ महिला समिती व ह.भ.प. जगन्नाथ महाराज थोरे यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्य वाटप करण्यात आले.समारंभाचया अध्यक्षस्थानी मंचच्या अध्यक्षा सौ सुधा भाभी ठोळे होत्या. स्वागत प्रास्ताविक कार्याध्यक्ष विजय बंब यांनी केले. शाळेच्या वतीने सर्व उपस्थितांचा गुलाब पुष्प व लेखनी देऊन गौरव करण्यात आला. सहशिक्षिका खैरनार, कानडे,वाणी यांच्या हस्ते दानशूर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. मंचच्या अध्यक्षा सौ सुधा भाभी ठोळे यांनी ‘ ईतनी शक्ती हमे देना दाता ‘ हे प्रार्थना गित गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
शालेय साहित्य वितरण समारंभासाठी योगतज्ञ उत्तम भाई शहा,ह.भ.प. मगर महाराज, मुरशतपर येथील दवंगे पाटील, साहित्यिक हेमचंद्र भवर , शाळेच्या शिक्षिका, विद्यार्थ्यीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहशिक्षिका वाणी यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *