कोकमठाण पंचक्रोशीतील शेतकर्यांच्या समस्या त्वरित सोडवा अन्यथा समृद्धी सर्कलचे कामकाज बंद पाडु…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरातील नागरिकांच्या विविध मागण्यांचे निवेदन कोपरगाव तहसीलदार यांना दि.२७ आँक्टोबर २०२२ रोजी देण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोकमठाण येथे समृध्दी महामार्गा अंतर्गत सडे रोड ते शामवाडी पर्यंत सर्विस रोड झालेला नाही. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.अर्धा गाव समृध्दीच्या पलीकडे व अर्धा गाव समृध्दी अलीकडे असल्यामुळे अर्धा गावाचा संपर्क तुटला आहे. सदर सर्विस रोड अत्यंत गरजेचे असल्या बाबत ग्रामस्थांनी मागणी केली आहे त्यामुळे समृध्दी महामार्गा अंतर्गत सडे रोड ते शामवाडी पर्यंत सर्विस रोड तात्काळ करण्यात यावा. कोकमठाण येथील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. कोकमठाण येथे खरीब पिक खूप मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले तरी कोकमठाण येथील सर्व शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की कोकमठाण येथील पिकांचे सरसकट पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई मिळावी.कोकमठाण येथे समृध्दी महामार्गा अंतर्गत कोकमठाण कारवाडी रोड वरील डग व पुणतांबा रोड वरील डग या दोन्ही डगमुळे नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सदर दोन्ही डगचे काम अत्यंत गरजेचे असल्या बाबत ग्रामस्थांनी मागणी केली आहे. त्यामुळे समृध्दी महामार्गा अंतर्गत कोकमठाण कारवाडी डग व पुणतांबा रोड वरील डग तात्काळ करण्यात यावा. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर समृद्धी महामार्गाचे सर्कलचे कामकाज बंद पाडु असा इशारा ग्रामस्थानी दिला आहे. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती संभाजी अप्पा रक्ताटे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाँईस चेअरमन सुधाकर रोहम, भाजप जिल्हाउपाध्यक्ष शरद नाना थोरात, सुदामराव लोंढे, विजयराव थोरात, नंदकिशोर पवार, दीपक रोहम, गोरक्ष लोहकणे, शरद फटांगरे, सोपान काशिंद, सुनिल लोंढे, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रमोद लोहकणे, विजय यादवराव रक्ताटे, बाबासाहेब रक्ताटे, विजय पंढरीनाथ रक्ताटे, उमेश लोंढे, विजय सांगळे, अंकुश वाळुंज, सोमनाथ क्षिरसागर, निखिल रक्ताटे, गोविंदराव नाईकवाडे, मधुकर मोगरे, बाळासाहेब जाधव, दुर्गेश देशमुख. यांच्यासह शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *