राष्ट्रवादीच्या दहीहंडीला अभिनेत्री माधुरी पवारची उपस्थिती जल्लोषासाठी गोविंदा पथक, तरुणाई सज्ज…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- दोन वर्षाच्या कालखंडानंतर श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगावात आज सायंकाळी ५ वाजता दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. या दहीहंडी उत्सवासाठी ना. आशुतोष काळे हे स्वत: उपस्थित राहणार आहेत. तसेच अभिनेत्री माधुरी पवार देखील उपस्थित राहणार आहे. त्यामुळे जल्लोष साजरा करण्यासाठी गोविंदा पथक आणि तरुणाई सज्ज झाली असून कोपरगाव शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण झाले आहे.
कोपरगाव मतदार संघात ना. आशुतोष काळे यांनी हजारो कोटींच्या विकास कामांचे डोंगर उभे करून दोन वर्षात मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला असून कोपरगाव शहर देखील त्याला अपवाद नाही. त्यामुळे दोन वर्षांनंतर होत असलेला दहीहंडी उत्सव साजरा करतांना हा उत्सव विकासाची दहीहंडी उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या विकासाच्या दहीहंडी उत्सवामध्ये गोविदा पथक व तरुणाईचा उत्साह वाढविण्यासाठी प्रसिद्ध सिनेसभिनेत्री माधुरी पवार उपस्थित राहणार आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवासाठी मोठी गर्दी होणार आहे. त्यासाठी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज होणाऱ्या दहीहंडी उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मुंबई, पुणे, नासिक आदी मोठ्या शहरात दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या धर्तीवर आजचा कोपरगाव शहरातील राष्ट्रवादीचा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना रोख स्वरुपात दिली जाणारी भरघोस बक्षिसे त्यामुळे दहीहंडी उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणाई जल्लोष करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसुन येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *