कोपरगावात काळे गटाचा कोल्हे गटाला धक्का घारी , ओगदी ग्रामपंचायत काळे गटाकडे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यात मंगळवार (दि.९) रोजी पार पडलेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत काळे गटाने कोल्हे गटाला अनपेक्षितपणे धक्का देत तालुक्यातील घारी व ओगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर कब्जा मिळवून सत्ता मिळविली आहे.
मागील महिन्यात पार पडलेल्या एकूण २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुक पार पडल्या. या ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होवून मंगळवार (दि.९) रोजी एकूण २९ ग्रामपंचायतीपैकी २६ ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडी पार पडल्या असून यापैकी घारी व ओगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडीप्रसंगी पार पडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काळे गटाने घारी व ओगदी ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंचपदी आपल्या गटाच्या सदस्यांची वर्णी लावून ओगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. अलका लालचंद जाधव, उपसरपंचपदी सोमनाथ जाकू झोरवर व घारीच्या सरपंचपदी रामदास कारभारी जाधव व उपसरपंचपदी सौ.ठकुबाई रामकिसन काटकर यांना निवडून आणून सत्ता मिळविण्यात यश मिळविले आहे.
ओगदी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काळे गटाचे ३ व कोल्हे ४ सदस्य निवडून आले होते व सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीनुसार सरपंचपदाच्या उमेदवार देखील कोल्हे गटाच्या निवडून आल्या होत्या मात्र कोल्हे गटाच्या सरपंचपदाच्या उमेदवार असलेल्या सौ. अलका लालचंद जाधव व सदस्या सौ. मीनाबाई आण्णासाहेब कोल्हे यांनी एक दिवस अगोदरच आमदार आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करून काळे गटात प्रवेश केल्यामुळे ओगदी ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच काळे गटाचे झाले आहेत. अशीच परिस्थिती घारी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीप्रसंगी झाली असून या ग्रामपंचायतीमध्ये काळे गटाचे चार व कोल्हे गटाचे पाच सदस्य निवडून आले होते. मात्र कोल्हे गटाच्या सदस्या ठ्कुबाई रामकिसन काटकर यांनी देखील आमदार आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य काळे गटात प्रवेश केल्यामुळे बहुमताच्या जोरावर घारी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रामदास कारभारी जाधव व उपसरपंचपदी सौ.ठकुबाई रामकिसन काटकर यांची निवड करण्यात येवून या ग्रामपंचायतीवर देखील काळे गटाने आपला झेंडा रोवला आहे.

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहम, संचालक संजय आगवण यांनी त्यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी वाल्मिक गोणटे, सौ. सुनिता जोरवर, सौ.मीनाबाई कोल्हे, वसंत गोणटे, सुरेश जोरवर, बाळासाहेब कोल्हे, राजाराम जोरवर, चांगदेव गोणटे, जाकू जोरवर, देवचंद सोनवणे, दत्तात्रय गोणटे, तानाजी जोरवर, दिलीप गोणटे, भगीरथ जोरवर, संजय गोणटे, उत्तम जोरवर. संतोष कोल्हे, योगेश जोरवर, रमेश सोनवणे, बाळू भालेराव, तुकाराम सोनवणे, संपत जोरवर, अनिल जोरवर, सुकदेव जोरवर, संदीप जोरवर, उत्तम जोरवर, गुलाब सावंत, संदीप सावंत, भास्कर गोणटे, सोमनाथ सोनवणे, बाळासाहेब सोनवणे, रघुनाथ जाधव, गोकुळ जोरवर, शांतीलाल पवार, शिवाजी जाधव, किरण पवार, पाराजी पवार, नारायण पवार, अविनाश पवार, शिवाजी बर्डे, कांतीलाल पवार, संजय पवार, विजय पवार, यांच्यासह काळे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळ- १)ओगदी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच यांचा सत्कार करतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर रोहम, संचालक संजय आगवण व कार्यकर्ते.

फोटो ओळ- २) घारी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रामदास कारभारी जाधव व उपसरपंचपदी सौ.ठकुबाई रामकिसन काटकर यांची निवड होताच त्यांचा सत्कार करतांना काळे गटाचे कार्यकर्ते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *