श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात मुख्याध्यापक कोर्हाळकर सर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
सोमवार १५आॕगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त श्रीमान गोकुळचंदजी विदयालय कोपरगाव येथे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं संस्थेचे माजी सेक्रेटरी,माजी नगराध्यक्ष आणि थोर स्वातंत्र्य सैनिक कै.जंगुशेठ अजमेरे यांचे प्रतिमेचे पुजन कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दीलीपकुमार अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,राहुल अजमेरे,निवृत्त मुख्याध्यापक सी.आर बजाज,डी.व्ही.तुपसैंदर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.


यावेळी देशभक्तिपर समुह गीत व समुहनृत्य विदयार्थीनी सादर केली.या नंतर विदयार्थीना राजगिरा लाडु वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.एन.के.बडजाते व एस.डी.गोरे यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मवारी आदींसह नागरिक या प्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *