

श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानची राष्ट्र उपासना…
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील वेस जुने गावठाण,सराफ बाजारातील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव शिवलिंगास भारतीय स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (७५ व्या वर्धापन दिनानिमित्त) विविध फुलांनी सजवले आहे…तसेच भारत सरकारचे हर घर तिरंगा या अभियानात सहभागी होत १३ ऑगस्ट रोजी देवस्थानचे सभामंडप कार्यालयावर भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा ध्वजारोहण केले आहे.सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत…शहाजीराजे भोसले… छत्रपती शिवाजीराजे महाराज… श्रीमंत पेशवे या सर्वांच्या कालखंडात पवार घराण्याचे स्वराज्य आणि सुराज्य लढाईतील योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे…श्रीमंत पवार सरकार संस्थानचे कालखंडात त्यांचे अधिपत्याखाली असलेल्या गावांचा कारभार अतिशय उत्तम आणि सर्वसमावेशक समजला जातो…पारतंत्र्यात कोपरगाव डाक कार्यालय पासून अनेक कारभार हा श्रीमंत पवार सरकार यांचे वाड्यातून होत असत…भारत स्वातंत्र्यानंतर श्रीमंत पवार सरकार संस्थान मध्यभारत संघात विलीन झाले…



भारतीय स्वातंत्र्य दिनाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त (७५ व्या वर्धापन दिनानिमित्त) सोमेश्वर महादेव देवस्थानचे सभामंडप कार्यालयावर राष्ट्रध्वज तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले आहे…तसेच सोमेश्वर महादेवाला झेंडू,शेवंती,बेल,गुलाब,गुलछडी,चंदनपाला आशा विविध फुलं पानांचा उपयोग शिवलिंग सजवितांना केला आहे… श्री गणेश चतुर्थी निमित्त मूर्ती पुजा व सजावट,गंगा माता मुर्ती पुजा व सजावट, नंदीच्या मुर्तीची सजावट केली आहे…मंदिराचे प्रवेशद्वारावर झेंडूची फुले आणि आंब्याचे पानांचे तोरण बांधले आहे…मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुशांतजी घोडके यांचे देवस्थानचे पुजारी श्री.विजयजी वाघमारे,श्री.नंदूजी शेंडे यांनी सुमारे तीन तास मेहनत घेऊन फुलांची सजावट केली आहे…

अध्यात्मिक भक्ती ईतकीच राष्ट्र उपासना महत्वाची असल्याचा संदेश या निमित्ताने श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थानचे सोमेश्वर महादेव मंदिर व्यवस्थापनाने दिला आहे… कोपरगाव नगरीतील धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे मानले गेलेले सोमेश्वर महादेवावर आजही ग्रामस्थांची मोठी श्रध्दा आहे…कोपरगाव शहरात जल संकटात या महादेव मंदिराचा गाभारा पुर्ण पाण्याने भरल्यानंतर सोमेश्वर महादेव जल संकटात अनेकदा धावून येतो…अशी ग्रामस्थांची भावना आहे…
सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख श्री.महेंद्रजी (बाळासाहेब) पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.सुशांतजी घोडके, व्यवस्थापन समितीचे श्री.नारायणशेठ अग्रवाल,श्री.मंगेशराव पाटील (मा.नगराध्यक्ष),श्री.चंद्रकांतजी कौले साहेब, श्री.महावीरशेठ शिंगी, श्री.जयंतजी विसपुते, श्री.मनोजजी कपोते,श्री.मनोजजी शिंदे,श्री.निलेशजी उदावंत,श्री.अमितजी गुजराथी,श्री.सोमनाथजी वडनेरे,देवस्थानचे पौरोहित्य श्री.प्रविणशास्री मुळे गुरु,श्री.गोपीनाथशास्री जोशी गुरु श्री.प्रदिपशास्री पदे गुरु,देवस्थानचे पुजारी श्री.विजयजी वाघमारे,श्री.नंदूजी शेंडे, महादेव देवस्थान बेट व्यवस्थापनचे ॲड.शामजी मुंदडा साहेब,श्री.तुषारजी आव्हाड,श्री.अशोकजी नाईकवाडे, श्री.मच्छिंद्रजी सोनवणे,श्री.दिपकजी शिंदे,श्री.विजय वाघमारे गुरव,गंगेश्वर महादेव जेऊर कुंभारी व्यवस्थापनचे श्री.पाटीलबा वक्ते, श्री.चंद्रकांतजी जोर्वेकर यांचे सह सोमेश्वर महादेव भक्त मंडळ कामकाज पहात आहे…

श्रीमंत पवार सरकार महादेव देवस्थानचे कार्यात योगदान देणारे सर्वांचे व्यवस्थापन समितीने आभार मानून स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत…
