सूर्यतेजच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
सूर्यतेज संस्था कोपरगावच्या वतीने शालेय गरीब-गरजू विद्यार्थ्यांना मोफत गृहपाठ वही आणि चित्रकला वहीचे वाटप केले असल्याची माहिती सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांनी दिली आहे…

सूर्यतेज संस्थेची स्थापना आषाढी एकादशी २००१ या दिवशी करण्यात आली आहे.सूर्यतेज वतीने गेल्या २२ वर्षांपासून हजारो गरजुंना मोफत वहीवाटप कुठलाही जाहीर कार्यक्रम नघेता करण्यात येत आहे.तसेच शैक्षणिक,सामाजिक,कला, क्रीडा, नाट्य, सांस्कृतिक, स्वच्छता, जलशक्ती, वृक्षारोपण आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे.तसेच कोपरगाव फेस्टिव्हलचे माध्यमातून ज्ञान-कला-मनोरंजनाचे वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे.
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त काही गरजूंना गृहपाठ वही सोबत चित्रकला वहीचे मोफत वितरण करण्यात आले आहे. शिशु विकास मंदिर, चक्रधर स्वामी विद्यालय,पद्मा मेहता कन्या विद्यालय, नगरपालिका शिक्षण मंडळ शाळा,एस.जी.विद्यालय,के.बी.पी.प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,एम.के.आढाव विद्यालय, डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालय येथे कुठलाही कार्यक्रम नघेता चित्रकला वही वितरण करण्यात आले आहे.या उपक्रमात सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके,प्रा.अनिल अमृतकर, डॉ.तुषार वायखिंडे,ॲड.महेश भिडे, सूर्यतेज सल्लागार प्रा.सौ.लताताई भामरे,सौ.कल्पना गिते महेश थोरात,अनंत गोडसे, रविंद्र भगत, राजर्षी शाहू महाराज जेष्ठ नागरिक सेवा मंचचे मनसाराम पाटील,विजय राहतेकर,गणपतराव विधाटे,रविंद्र शहाणे,भावसार, कल्पेश टोरपे यांचे सह सूर्यतेज सदस्यांचे सहकार्य लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *