कोपरगाव प्रतिनिधी:-
येथील श्री. सदगुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता कोपरगाव तालुका तहसीलदार मा. विजय बोरुडे, कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. सचिन सुर्यवंशी, कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. विकास घोलप, गोदावरी बचाव अभियानाचे प्रवर्तक मा. आदिनाथ ढाकणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रमेश सानप आदी मान्यवरांच्या शुभहस्ते शासनाच्या हर घर तिरंगा अभियानाला प्रतिसाद देत महाविद्यालयातील विद्यार्थ्याना राष्ट्रध्वजांचे वितरण करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर महाविद्यालय परिसरात जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीत महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र, सेना, राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक, क्रीडा विभागातील विद्यार्थ्यांसह ज्युनिअर विभागातील विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, भारत माता की जय, हर घर तिरंगा या घोषणांनी सारा महाविद्यालय परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रगीताने या प्रभात फेरीची सांगता झाली. यानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या संकल्पनेला केंद्रवर्ती ठेवून आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते झाले. देश भक्ती, देशप्रेम या भूमिकेतून अनेक विद्यार्थ्यांनी आपली रांगोळी कला प्रदर्शित केली. महाविद्यालयाच्या सभागृहात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा संपन्न झाली, या स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना मा. सचिन सुर्यवंशी म्हणाले की, ज्या थोर क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला व आपले सर्वस्व पणाला लावले त्यांच्याप्रतीची सद्भावना व प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची जाणीव जागृत व्हावी म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येतो, देशाच्या समृद्ध वाटचालीत एक जबाबदार नागरिक म्हणून विद्यार्थ्यांनी पुढे यावे असे सांगत अमृत महोत्सवानिमित्त सर्वांनी चांगले संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोपरगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास घोलप यांनी रक्तदानाचे फायदे सांगितले व अमृत महोत्सवी रक्तदान शिबिरात विद्यार्थ्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. अविनाश ढाकणे यांनी गोदावरी बचाव अभियानातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागाची प्रशंसा केली. तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात विद्यार्थ्यांनी देशातील वैविध्यपूर्ण घटनांचे चिंतन करीत ज्ञानप्रधान युगातील आव्हानांना सामोरे जावे असे मत व्यक्त केले. सदर प्रसंगी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोपरगाव पंचायत समिती मार्फत स्वातंत्र्यदिनी सुरु करण्यात येणाऱ्या संकल्पित सुसज्ज ग्रंथालयास महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ग्रंथ भेट दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी सदर ग्रंथ पंचायत समितीचे प्रशासक तथा गटविकास अधिकारी श्री. सचिन सूर्यवंशी यांचेकडे सुपूर्द केले. महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित निबंध स्पर्धेस उदंड प्रतिसाद लाभला असून वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विभागांमार्फत स्वातंत्र्यदिनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशील प्रतिभेचा आविष्कार म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावरील भित्तीपत्रिकांचे प्रकाशन होणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रमेश सानप यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या सर्व उपक्रमांचे संयोजन शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुभाष देशमुख, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख प्रा. डॉ. चंद्रभान चौधरी, प्रा. शोभा दिघे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश दिघे, डॉ. बी. एम. वाघमोडे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. माधव यशवंत तसेच प्रा. सौ. छाया शिंदे, प्रा. एन. टी. बिरारी, प्रा. सौ. कलावती देशमुख, प्रा. जयश्री शेंडगे, प्रा.अक्षय आहेर, कर्यालयीन अधीक्षक श्री. सुनील गोसावी यांनी केले.
कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश सानप यांनी केले. प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. बी. बी. देवकाते यांनी केले. प्रा. सौ. छाया शिंदे यांनी आभार मानले. सदर प्रसंगी कला विभागाचे उपप्राचार्य डॉ.सुभाष रणधीर, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य प्रा. अरुण देशमुख, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.विजय निकम, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. रामभाऊ गमे आदींसह सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

हर घर तिरंगा अभियान शुभारंभाप्रसंगी विद्यार्थ्यांना राष्ट्रध्वज वितरीत करताना मा.तहसीलदार विजय बोरुडे, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, डॉ. विकास घोलप, अविनाश ढाकणे, प्राचार्य डॉ. रमेश सानप, प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे व प्राध्यापक, विद्यार्थी

देश भक्ती पर गीत गायन स्पर्धा उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, व्यासपीठावर डॉ. विकास घोलप, अविनाश ढाकणे, प्राचार्य डॉ. रमेश सानप, उपप्राचार्य प्रा. डॉ. सुभाष रणधीर, प्रा. डॉ. बाबासाहेब शेंडगे
हर घर तिरंगा अभियानात सहभागी विद्यार्थी

