
कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील ट्रस्ट, एसजेएस हॉस्पिटल, कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र, वारी येथे ग्रामपंचायत सदस्य स्व. राहुलदादा टेके पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मोफत सर्वरोग निदान शिबीर नुकतेच संपन्न झाले. या शिबिरात वारीसह पंचक्रोशीतील ४१० रुग्णांनी आपली तपासणी करून घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीश कानडे होते.
या शिबिरासाठी कोपरगाव पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, सोमैया उद्योग समूहाचे संचालक सुहास गोडगे, सरव्यवस्थापक बी. एम. पालवे, एसजेएस हॉस्पिटलचे वैद्यकिय अधिकारी डॉ. शशांक तुसे, वारी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी राजेंद्र पारखे, हॉस्पीटलचे समन्वयक महेश रक्ताटे, पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिद्र टेके, माजी सदस्य अशोक कानडे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नामदेव जाधव, ग्रामपंचायत सदस्य मधुकर टेके, प्रकाश गोर्डे, प्रशांत संत, विवेक टेके, कामगार संघटनेचे उपाध्यक्ष संजय टेके, सुभाष जाधव, भाऊसाहेब टेके, विजय ठाणगे, नरेंद्र ललवाणी, वसंत गोरे, विजय निळे, मच्छिद्र महाराज टेके, साहेबराव जगताप, वसंत टेके, अशोक बोर्डे, कोपरगाव येथील छायाचित्रकार संजय भवर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थीत होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते स्व. राहुलदादा टेके यांच्या प्रतिमापुजन व दिपप्रज्वलाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तालुका वैद्यकीय तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, सोमैया उद्योग समूहाचे संचालक सुहास गोडगे, माजी सभापती मच्छिद्र टेके यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. शिबिरात एसजेएस हॉस्पिटलचे वैद्यकिय अधिकारी डॉ. शशांक तुसे, डॉ. काजल तुसे, डॉ. राहुल वाघमारे, डॉ. रोहिणी घोरपडे, डॉ. राहुल पारदे, डॉ. अनिरुद्ध उबाळे, डॉ. नेहा भद्रा, डॉ. साळवे मडम, नितीन बद्रे यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबीर याश्वितेसाठी टेके पाटील ट्रस्टचे सर्व स्वयंसेवक, एसजेएस हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, मित्र परिवार व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक, सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार शंकर महाराज गोंडे यांनी मानले.

शिबिरात रुग्णांना देण्यात आलेला लाभ..
या शिबिरामध्ये बी. पी, २ डी इको, ई.सी.जी तपासणी, शुगर, अँजिओप्लास्टी, जिओग्राफी, बायपास, नेत्रतपासणी, अस्थीरोग, पोटांचे विकार यांच्या ४१० रुग्णाच्या मोफत तपासण्याबरोबरच आवश्यकता असलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच अलोपाठी अँलोपथी, आयुर्वेदिक, होमियोपॅथी तपासणी करून ही औषधे मोफत देण्यात आली.


फोटोओळी:-
वारी येथे सर्व रोग निदान शिबिर उत्साहात संपन्न झाले.
