कोपरगांव प्रतिनिधी:-
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या २०२२.२३ गळीत हंगामासाठी पहिला मिल रोलर कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी विधिवत पुजनाने बसविण्यांत आला.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, तालुक्याच्या प्रथम महिला आमदार, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांने मागील हंगामात विक्रमी ऐतिहासिक उच्चांकी गाळप करून आगामी हंगामाची नियोजनबध्द तयारी सुरू केली आहे. याप्रसंगी विवेक भैय्या कोल्हे यांनी हंगामपूर्व मशिनरी दुरूस्ती, गव्हाण विस्तारीकरण, नवीन मिल फाउंडेशन, देखभालीची प्रगतीपथावर असलेल्या कामांची पाहणी करून त्याबाबतचा आढावा घेत आवश्यक तेथे सुचना केल्या. कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, चीफ केमिस्ट विवेककुमार शुक्ला, चीफ इंजिनियर के के शाक्य, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, ए. के. टेंम्बरे यांनी कारखान्यातील आधुनिकीकरणाबाबत माहिती दिली.
याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक सर्वश्री विश्वासराव महाले, निवृत्ती बनकर, ज्ञानेश्वर होन, पाराजी औताडे, विलासराव वाबळे, बाळासाहेब वक्ते, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, सतिष आव्हाड, रमेश आभाळे, ज्ञानेश्वर परजणे, राजेंद्र परजणे, कामगार नेते मनोहर शिंदे, वेणुनाथ बोळीज यांच्यासह सर्व खातेप्रमुख, उप खातेप्रमुख, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, इंजिनियरींग विभागाचे सर्व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. इंजीनियरिंग विभागाच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, उपाध्यक्ष रमेश घोडेराव व सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला.


फोटोओळी:-कोपरगांव
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या २०२२.२३ गळीत हंगामासाठी पहिला मिल रोलर कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते विधिवत पुजनाने बसविण्यात आला याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव सर्व संचालक, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार आदि उपस्थित होते.
