श्री संत सावता माळी युवक संघ जगभरातील युवकांसाठी हक्काचे व्यासपीठ:- शेखर बोरावके…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:- जगभरातील युवकांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या प्रश्नांकडे, समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले जावे, सक्रीयपणे समाजासाठी योगदान देण्याची उर्जा निर्माण व्हावी. तसेच युवकांना योग्य मार्ग आणि दिशा देऊन सर्वांगीण विकास साधला जावा यासाठी संस्थापक सचिन गुलदगड यांनी श्री. संत सावता युवक संघाची स्थापना केली बघता बघता युवक संघाचे कार्य गावपातळीपासुन ते देशपातळीपर्यंत सुरु असुन या कार्यात युवक वर्ग मोठी जवाबदारी घेवुन काम करत असुन अशाच जवाबदारी घेवुन काम करणारे सामाजिक कार्यकर्ते औंकार संतोष वढणे यांची कोपरगांव शहर कार्याध्यक्ष पदी निवडीची घोषणा श्री संत सावता माळी युवकसंघाचे शहरध्यक्ष शेखर बोरावके यांनी केली. 
माळी युवक संघाचे संस्थापक सचिन गुलदगड, राज्य सचिव सुनिल गुलदगड, जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे यांच्या मार्गदर्शनखाली युवक संघाच्या नवीन पदाधिकारी नियुक्ती , सामाजिक , सांस्कृतिक , शैक्षणिक उपक्रम राबविणेबाबत विशेष बैठक आयोजित केली त्याप्रसंगी शहरध्यक्ष शेखर बोरावके बोलत होते. 
शेखर बोरावके मार्गदर्शन करतांना म्हणाले की, 
देशाची प्रगतीसाठी युवकांवर मोठी जवाबदारी आहेत त्याच प्रमाणे माळी युवक संघ वाढविण्यासाठी समाजातील युवकांनी देखील  जवाबदारी घेवुन काम करत असाल्यामुळेच गावपातळी पासुन ते देश पातळीवर श्री. संत सावता माळी युवक संघाचे नाव पोहचले आहेत. जे शक्य नाही ते शक्य आहेत ते युवक संघाच्या प्रत्येक सदस्यांनी करुन दाखविले. संघाची सदस्य नोंदणी सुरु आहेत जास्तीतजास्त  युवकांनी सदस्य नोंदणी करावे असे आवाहन  करुन शहरध्यक्ष शेखर बोरावके यांनी कमी वेळेत सामाजिक क्षेञात नावलौकिक झालेले औंकार संतोष वढणे यांची कोपरगांव शहर कार्याध्यक्ष पदी निवडीची घोषणा करुन जिल्हाध्यक्ष मुकुंदमामा काळे यांच्या हस्ते वढणे यांचा सत्कार केला.
सत्कारास उत्तर देतांना औंकार वढणे म्हणाले की, युवक संघाचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी दिलेली जवाबदारी मी स्विकारली आहेत. कामकाज करतांना युवक संघाच्या नावाबरोबर माळी समाजाचे नाव नावलौकिक करणार त्याच बरोबर कोणत्याही अन्याय होत असेल तर नक्कीच त्या व्यक्तीस न्याय मिळवुन देणार त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी चालेल. आगामी होणार नगपरिषद, जिल्हा परिषद, इतर निवडणुकांमध्ये देखील उमेदवारी केली पाहीजे निवडणुकीत उभे राहणारे समाजातील प्रत्येक व्यक्तीस निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे औंकार वढणे म्हणाले. 
आयोजित केलेल्या बैठकीत अशोक माळवदे कोपरगाव तालुकाध्यक्ष, संतोष रांधव उपाध्यक्ष, डाॅ.मनोज भुजबळ कार्यअध्यक्ष, योगेश ससाणे सचिव, संदीप डोखे संपर्क प्रमुख, अनंत वाकचौरे खजिनदार, मनोज चोपडे शहर उपाध्यक्ष,  दीपक हीवाळे सचिव, विजय वढणे, बापु शिवरकर,प्रदीप वढणे, नंदकुमार वढणे, प्रशांत ससाणे, सुनिल मंडलिक, पोलीस पाटील देवेश माळवदे, संतोष ससाणे, कैलासराव सोमासे, गणेश राऊत,गणेश काळे, परीमल कोद्रे, शंकर पुंड, ओम वढणे,सुजित ससाणे, कृष्णाभाऊ बोरावके,सोमनाथ वाकचौरे, नितीन मामा गिरमे, प्रविणभाऊ आनप, अशोकराव भुजबळ, केशवराव दारवंटे आदि उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *