कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक सदस्यपदाचे आरक्षण जाहीर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२
दि. १३/०६/२०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी चिठ्ठ्या टाकून जागांचे आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही खालीलप्रमाणे करण्यात आली :-
१. प्रथम उपस्थित सर्व प्रतिनिधी/नागरिक यांना नगरपरिषदेच्या निवडणूकीसंबंधी खाली नमूद केल्याप्रमाणे सविस्तर माहिती देण्यात आली :-
खालील दर्शविल्याप्रमाणे निवडावयाच्या सभासदांची संख्या, अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती करिता राखून ठेवण्याच्या जागा व स्त्रीयांसाठी (अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चीत केलेल्या आहेत :-
१) निवडावयाच्या सभासदांची संख्या : ३०
२) अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती यासाठी
राखून ठेवावयाच्या जागांची संख्या
(अ) अनुसुचित जाती : ०५
(ब) अनुसुचित जमाती : ०१
३) स्‍त्रीयांसाठी (अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व
सर्वसाधारण स्त्रीयांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरुन) : १५
४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ (अ)(ब) येथील जागामध्ये
अनुसुचित जाती अनुसुचित जमाती स्त्रीयासाठी राखून ठेवावयाच्या जागांची
संख्या खालील प्रमाणे राहील
(अ) अनुसुचित जाती : ०३
(ब) अनुसुचित जमाती : ००
५) स्त्रीयांसाठी सर्वसाधारण जागा म्हणून राखून ठेवावयाच्या जागांची
संख्या (अ.क्रं.३ समोरील नमुद केलेल्या जागा वजा
अ.क्रं ४ समोरील नमुद केलेल्या जागा.) : १२
सन २०११ च्या जनगणनेतील अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती करिता प्रभागातील लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने लावलेनंतर लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार प्रभाग क्र. ८,९,११,२,१५ या प्रभागातील प्रत्येकी एक जागा अनुसूचीत जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे.


तसेच अनुसूचीत जमातीच्या १ जागेसाठी लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार प्रभाग क्र. ५ मधील १ जागा अनुसूचीत जमातीसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे.
मा. राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक ०९/०६/२०२२ च्या आदेशानुसार अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमाती यांचेसाठीचे प्रभाग आरक्षित झालेल्या जागेवर अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव जागांसाठी चिठ्ठ्या टाकून सोडत काढण्यात येत आहे.
वरीलप्रमाणे मा. नियंत्रक तथा प्राधिकृत अधिकारी यांनी सभागृहास माहिती दिली.
२. सोडतीकरिता नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या शाळा क्र. ४ मधील खालील लहान मुले/मुली उपस्थित होते :-
१) मदीहा तेहरीम मुबशीर खान २) सारा हरूण शेख
३) सिद्दीक हरूण शेख ४) झारा बिलाल शेख
५) आइशा सिराज शेख
वरील उपस्थित विद्यार्थीनींच्या नावानुसार चिठ्ठ्या तयार करून त्यामधून एक चिठ्ठी काढण्यात आली. त्यामधून आइशा सिराज शेख हिचे नाव चिठ्ठीत आलेले आहे. तिच्या हस्ते पुढील सोडती काढण्यात आल्या.
३. अनुसूचीत जाती महिलांची सोडत :-
अनुसूचीत जातीकरिता राखीव ठेवणेत आलेले प्रभाग क्रमांक २,८,९,११,१५ याप्रमाणे ५ चिठ्ठ्या टाकण्यात येणार असून त्यामधून ३ चिठ्ठ्या काढण्यात येणार आहेत.
आइशा सिराज शेख या विद्यार्थीने पहिली चिठ्ठी काढली असता प्रभाग क्रमांक २ अ हा अनुसूचीत जाती महिलांकरिता राखीव झालेला आहे.
दुसरी चिठ्ठी काढली असता प्रभाग क्रमांक ८ अ हा अनुसूचीत जाती महिलांकरिता राखीव झालेला आहे.
तिसरी चिठ्ठी काढली असता प्रभाग क्रमांक ११ अ हा अनुसूचीत जाती महिलांकरिता राखीव झालेला आहे.
अनुसूचीत जातीच्या महिलांकरिता ३ प्रभाग सोडतीने खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले :-
सोडतीकरिता उपलब्ध असणारे अनुसूचीत जातीच्या प्रभागांचे क्रमांक सोडतीमध्ये अनुसूचीत जातीच्या महिलांकरिता आरक्षित झालेल्या प्रभागांचे क्रमांक
२ अ २ अ
८ अ ८ अ
९ अ –
११ अ ११अ
१५ अ –

४. अनुसूचीत जमाती महिलांची सोडत :-
अनुसूचित जमातीकरिता लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार प्रभाग क्रमांक ५ मधील ०१ जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे. सदर जागा ही अनुसूचीत जमाती पुरुष करिता राखीव ठेवण्यात आलेली आहे.
५. सर्वसाधारण महिलांची सोडत :-
उर्वरित राहिलेले प्रभाग क्रमांक १,३,४,५,६,७,९,१०,१२,१३,१४,१५ हे १२ प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी राखीव राहतील.
वरीलप्रमाणे कार्यपद्धती अनुसरून उपस्थित मुलाच्या हाताने उपस्थित सर्व नागरिक/प्रतिनिधी यांचे समक्ष चिठ्ठ्या काढण्यात येऊन खालीलप्रमाणे आरक्षित प्रभाग निश्चित करण्यात आले.

अ.क्र. प्रभाग क्रमांक जागा क्रमांक आरक्षण
१. १ अ सर्वसाधारण (महिला)
ब सर्वसाधारण
२. २ अ अनुसूचीत जाती (महिला)
ब सर्वसाधारण
३. ३ अ सर्वसाधारण (महिला)
ब सर्वसाधारण
४. ४ अ सर्वसाधारण (महिला)
ब सर्वसाधारण
५. ५ अ अनुसूचीत जमाती
ब सर्वसाधारण (महिला)
६. ६ अ सर्वसाधारण (महिला)
ब सर्वसाधारण
७. ७ अ सर्वसाधारण (महिला)
ब सर्वसाधारण
८. ८ अ अनुसूचीत जाती (महिला)
ब सर्वसाधारण
९. ९ अ अनुसूचीत जाती
ब सर्वसाधारण (महिला)
१०. १० अ सर्वसाधारण (महिला)
ब सर्वसाधारण
११. ११ अ अनुसूचीत जाती (महिला)
ब सर्वसाधारण
१२. १२ अ सर्वसाधारण (महिला)
ब सर्वसाधारण
१३. १३ अ सर्वसाधारण (महिला)
ब सर्वसाधारण
१४. १४ अ सर्वसाधारण (महिला)
ब सर्वसाधारण
१५. १५ अ अनुसूचीत जाती
ब सर्वसाधारण (महिला)
वरीलप्रमाणे चिठ्ठ्या टाकण्याची कार्यपद्धती सर्व उपस्थित नागरिक / प्रतिनिधी यांचे समक्ष पूर्ण करण्यात आली. प्रभागांच्या सोडत पद्धतीनुसार निश्चित केलेल्या प्रभागनिहाय जागेबाबत अन्य कोणतीही काहीही तक्रार असल्यास विहित कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्याची माहिती देण्यात आली. वरीलप्रमाणे कामकाज पूर्ण करण्यात येऊन उपस्थित सदस्य / नागरिकांचे/ प्रतिनिधींचे आभार मानून विषयांकित सभा संपल्याचे जाहीर कारण्यात आले.
 उपस्थित मान्यवर :-
1) नियंत्रक तथा प्राधिकृत अधिकारी मा. श्री. बालाजी क्षीरसागर (उपजिल्हाधिकारी, भूसंपादन)
2) मा. श्री.शांताराम गोसावी, मुख्याधिकारी तथा प्रशासक
3) श्री. ज्ञानेश्वर चाकणे, उपमुख्याधिकारी
4) सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *