
कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील डाऊच खुर्द येथील श्री.योगी विरबा सेवा ट्रस्टला कोपरगाव शहर पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते साहेब, कुंढारे साहेब, मुरकुटे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली असता श्री दाते साहेब यांनी ट्रस्टचे कानिफनाथ महाराज मंदिरात दर्शन घेवून कानिफनाथ महाराज मढी व मच्छिंद्रनाथ महाराज यांचे समाधी दर्शनाचे महत्व सांगितले. लहान वयात मुलांवर धार्मिक संस्कार झाल्यास मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत नाहीत, त्यामुळे ट्रस्टच्या माध्यमातून मुलांसाठी धार्मिक शिबिरांचे आयोजन करणे, गरीब गरजू व अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन या वेळी केले. मंदिर परिसरात असलेल्या झाडांची निगा राखून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल असेही यावेळी ते म्हणाले.या प्रसंगी ट्रस्टच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष गणेश बढे, चंद्रकांत पारखे, जनार्दन आंबीलवादे, गोविंद गुरसळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
