
कोपरगाव प्रतिनिधी:-
कामिका एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पुणतांबा येथे मोठी यात्रा भरते श्री गंगागिरीजी महाराजांच्या मोठ्या सप्ताहाची घोषणा व नारळ येथे देऊन स्थळ जाहीर केले जाते अहमदनगर औरंगाबाद नाशिक जिल्ह्यातील भक्त भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात कोरोना महामारीतून सुटल्यावर यंदा गर्दी विचारात घेऊन कोपरगाव बस आगाराचे व्यवस्थापक अभिजित चौधरी यांनी बसचे नियोजन केले त्यांना स्थानक प्रमुख कुटेताई अविनाश गायकवाड व वाहतूक नियंत्रक यांनी सहकार्य केले तर पुणतांबा येथे पंकज निळे दिपक पारखे सोनु डोईझोड शंकर धोत्रे आदिंनी सहकार्य केले कोपरगाव राहाता वैजापूर तालुक्यातील भक्त पाई दिंडिने येत असतात परतीच्या प्रवासाला बस आगाराचे सहकार्य मिळाल्याने भक्तांच्या मनातून समाधानी भावना व्यक्त केल्या गेल्या
