निराधारास दिला आधार, किडनी आजाराने ग्रस्त असलेल्या ‘साई महिलेचे साई धाम फाउंडेशन मुंबई यांनी उचलला खर्च…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी :- वैजापूर येथील हजरत सय्यद शाहरुकनोद्दिन शहीद रह.अ. उर्फ नौगाजी बाबा यांच्या दर्शनासाठी आलेल्या आत्मा मलिक हॉस्पिटल कोकमठाण येथील जनसंपर्क अधिकारी शाहनवाज शाह यांना एक महिला किडणीच्या आजारांनी ग्रस्त असल्याची माहिती मिळाली. शाहनवाज शाह यांनी त्या महिलेस विचारपूस केली असता त्याला ईलाज करण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले.शाह यांनी तालुक्यातील शिवराई येथील डॉ. सुशांत डांगे यांना फोन करून बोलावले डॉ. नी प्राथमिक तपासणी करून पुढील उपचारासाठी तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात सांगितले. महिलेची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शाह यांनी वैजापूर शहरातील समाजसेवक जाकीर कुरेशी यांना फोन करून रुग्णवाहिका मागितली व त्यात रुग्ण महिलेला घेऊन कोकमठाण येथील आत्मा मलिक हॉस्पिटल येथे दाखल केले.रुग्णाच्या उपचारासाठी खर्च जास्त असल्याने शाहनवाज शाह यांनी मुंबई येथील साई धाम फाउंडेशन शी संपर्क साधला व महिलेल्या राहण्यास घर नाही, महिलेकडे शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची ओळख पत्र नाही आणि त्याला त्वरित उपचाराची गरज असल्याची माहिती दिली त्यावर साई धाम फाऊंडेशनने सर्व खर्च उचलून महिलेचा ईलाज केला. निशा बागुल वय 30 वर्ष असे रुग्ण महिलेचे नाव आहे. शाहनवाज शाह यांनी केलेल्या कार्याचा सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *