रिपब्लिकन सेनेच्या राज्य सदस्यपदी परशरम साबळे यांची नियुक्ती…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार , विश्वभूषण, महामानव , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनापती रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त समाज भुषण रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी विश्वशांतीदूत परशराम साबळे यांची महाराष्ट्र राज्य, रिपब्लिकन सेनेच्या राज्य ‘सदस्य’ पदी नियुक्ती केल्याचे पत्र देत अभिनंदन केले आहे.

या प्रसंगी उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे(आठवले) प्रदेशाध्यक्ष श्रीकांत भालेराव, विजय शिंगाडे, डॉ. खोत,माजी सरपंच पगारे, जालू मोकळं, मयूर गोरे आदी सह राज्यभरातील रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *