कोपरगांवच्या भाच्यांनी चंद्रावरील मनुष्यवस्ती आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकावले यश…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
येथील कोपरगांव औद्योगिक वसाहतीत फार्मा केमचे रासायनिक अभियंते कुलदीप वसंतराव देशमुख यांच्या नाशिक येथील शाईल संतोष हासे व अनुराग कौस्तुभ मोरे या दोन भाच्यांनी जागतिक युरोपियन स्पेस एजन्सीच्यावतीने घेण्यांत आलेल्या चंद्रावरील मनुष्यवस्ती संदर्भातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करत जगात तिसरा कमांक पटकावला त्याबददल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. दहेगांवबोलका येथील प्रगतशिल शेतकरी व कांदा उत्पादक तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्या दोन कन्येची ही मुले आहेत.
मुनकॅम्प संदर्भात २०१८ पासुन हया स्पर्धा भरविल्या जातात २०२१.२२ मध्ये नाशिकच्या अशोक इंटरनॅशनल स्कुल मध्ये इयत्ता दहावीत शिकत असलेला शाईल संतोष हासे व दिल्ली पब्लिक स्कुल (नाशिक) मध्ये इयत्ता सहावीत शिकत असलेल्या अनुराग कौस्तुभ मोरे यांनी कल्पना टीमचे प्रतिनिधीत्व करत चंद्रावर मनुष्यवस्ती वास्तव्यास जाण्यासाठी थ्रीडी मॉडेल सॉफटवेअरद्वारे ऑनलाईन पध्दतींने चंद्रावर ऑक्सीजन, पाणी, खाद्य, घराची रचना आदिबाबत मॉडेल तयार करून ते सादर केले होते. या जागतिक स्पर्धेत ६३ देशातील ५ हजार पेक्षा जास्त १५ वर्षे वयोगटाच्या आतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. भारत देशातुन ४४ संघ यात दाखल झाले होते. या स्पर्धेचे प्रसारण २०२१ मध्ये वेबीनारद्वारे करण्यात आले. युरोपियन स्पेस एजन्सीचे वैज्ञानिक फेंक-देविनी यांनी यातील सहभागी स्पर्धकांना अंतराळाबाबत दोन प्रश्न विचारले होते त्यापैकी एका प्रश्नाचे उत्तर परिक्षक देणार होते.
अंतराळात चंद्रावर यान पाठवितांना प्रकल्पाच्या ७० टक्के खर्च हा इंधनावर होतो त्यासाठी दुसरे इंधन वापरून हा खर्च कमी करता येईल काय असा प्रश्न कल्पना टिमच्यावतीने शाईल संतोष हासे याने विचारला होता त्याबददल परिक्षकांनी भारतीय कल्पना टिमचे कौतुक केले. जग हे हरित तंत्रज्ञानाकडे वळत असुन त्यावर संशोधन सुरू असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पावरही शास्त्रज्ञांनी प्रश्न विचारले.
भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकल्याबददल अंतराळ प्रकल्पाचे जयंत जोशी तसेच इस्त्रोचे मंगळयान वैज्ञानिकांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या. चि. शाईल याचे वडील संतोषराव हे बांधकाम व्यावसायिक आहेत तर आई सौ आरती हया एम.कॉम. जी डी सी अँड ए उच्चशिक्षीत गृहीणी आहेत. तर वि. अनुरागचे वडील कौस्तुभ हे पिंपळगांव बसवंत येथे निष्णात डोळयाचे डॉक्टर आहेत तर आई सौ आरती हया एम.एस्सी भौतिकशास्त्र गणित, बी. एड उच्चशिक्षीत असुन त्या मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पिंपळगांव बसवंत येथे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आहेत. या दोन्ही भाच्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या श्रीमती निलीमाताई पवार, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, सर्व संचालक, भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, सर्व संचालक, माजी संचालक डॉ गुलाबराव वरकड, शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष विलासराव कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य त्रंबकराव सरोदे, सरपंच साधना रवींद्र देशमुख, उपसरपंच विकास कुलकर्णी, बाळासाहेब देशमुख, रामदास देशमुख, दहेगांवबोलका रहिवासी ग्रामस्थांनी अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *