
कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या वतिने येवला रोड विभागातील विविध समस्या सदंर्भात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देऊन १८ जुनच्या आत कामे सुरु करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा ईशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी ता.अध्यक्ष- आनिल भाऊ गायकवाड ता.मार्गदर्शक- सुनिलभाऊ फंड दत्ता गर्दे,प्रविण पवार,आनिकेत खैरे,आतिश शिंदे. आदि कार्यकर्ते उपस्थित होते.या भागातील पाण्याची टाकी,महाजन वखार ते प्रेम सागर स्वीटस भुमीगत गटार करणे (३ वर्षापुर्वी मजुंर असलेली गटार अजुनही झालेली नाही)नविन डिपी रोड तात्काळ करणे.मयुरेश्वर गणपती मंदिरामागिल शौचालयाचे नुतणीकरण करणे.अशा विविध विषयांचे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना देण्यात आले आहे.
