कोपरगांव प्रतिनीधी:-
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी एम.बी.ए. ला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे संलग्नीत पीएच.डी. सेंटरची मान्यता मिळाली असुन महाराष्ट्रातील अनेक एम.बी.ए. शिक्षण देणाऱ्या संस्थांचे व्यवस्थापनच कोलमडले असताना संजीवनी एम.बी.ए. वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवीन किर्तीमान स्थापित करीत आहे, अशी माहिती संजीवनी एम.बी.ए.च्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
प्रभात उद्योग समुहाचे संस्थापक श्री. सारंगधर निर्मळ यांचे हस्ते या पीएच.डी. सेंटरचे उद्घाटन झाले. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, फेलो-आयआयएम, अहमदाबादचे डाॅ. शांतम शुक्ला, राॅयल अॅग्रोचे संचालक श्री अनिकेत देशमुख , उद्यम इन्फो सोल्युशनचे संस्थापक श्री उल्हास भाले, अस्था बायेकेअरचे संचालक श्री शंकर बळे, संजीवनी काॅलेज ऑफ इंजिनिअरींग अँड एम.बी.चे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर, एम.बी.ए. विभागाचे प्रमुख डाॅ. विनोद मालकर, आदी उपस्थित होते.
सदर प्रसंगी श्री निर्मळ म्हणाले की ग्रामिण भागातील उद्योग वाढवुन अर्थव्यवस्था कशी सुधारता येईल यावर संशोधन होणे गरजेचे आहे. ग्रामिण भागातील जनतेवर विशेषतः शेतकऱ्यांवर अनेक आसमानी-सुलतानी संकट कोसळत असतात. ग्रामिण भागात उद्योग उभे राहीले तर ग्रामिण भागातील जनतेला रोजगार निर्माण होवुन त्यांची अर्थव्यवस्था स्थिरस्तावर राहण्यास मदत होईल. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक कै. शंकरराव व कोल्हे यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार संथेचे कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी संजीवनी संचलित सर्वच संस्था दर्जा व गुणवत्तेच्या जोरावर एका वेगळ्या उंचीवर नेवुन ठेवल्या आहेत, याचा फायदा ग्रामिण भागातील विध्यार्थ्यांना होत आहे, ही बाब सामाजीक बांधिलकीच्या भावनेतुन खुप महत्वाची आहे.
या पीएच. डी. सेंटरमधुन आता फायनान्स, एचआर, ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट या विषयांमध्ये गाईड डाॅ. विनोद मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली शक्य होणार आहे.

फोटो ओळी: संजीवनी एमबीए मधिल पीएच.डी. सेंटरचे उद्घाटन करताना प्रभात उद्योग समुहाचे संस्थापक श्री. सारंगधर निर्मळ. यावेळी श्री अमित कोल्हे, डाॅ. ठाकुर व इतर मान्यवर उपस्थित होते.
