नाभिक एकता महासंघ व सलुन असोसिएशनच्या वतीने सत्कार सोहळा‌ संपन्न….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी राहुरी:-
गौरव समारंभ
राहुरी फॅक्टरी शहर नाभिक एकता महासंघ व सलुन असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार समारंभ सोमवार १ फेब्रुवारी रोजी राहुरी फॅक्टरी येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य नाभिक एकता महासंघाचे कार्याध्यक्ष मा.श्री किरणभाऊ बिडवे व उत्तर अहमदनगर नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष साईभक्त मा.श्री मनोजभाऊ वाघ या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत समारंभ साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुकाध्यक्ष पत्रकार मा.श्री अनिलजी वाकचौरे यांनी भुषविले. सदर समारंभात उपस्थित महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.अलकाताई वाघमारे, श्री कल्याणजी राऊत, श्री भाऊसाहेब दादा बिडवे, श्री बाबाजी बिडे, श्री अनिलजी बिडे, श्री बापूसाहेबजी दुधाडे, श्री मयूरजी दुधाडे, श्री सरोजजी तुपे, साईभक्त श्री किशोरजी बिडवे सर, श्री बाळासाहेबजी वाघ, श्री संजयजी जाधव, श्री गणेशजी बिडवे, श्री दिलीपजी विळसकर, श्री अशोकराव कोरडे, श्री संजयजी जाईबाहार, संघटक श्री सुनिलजी विश्वासराव, कार्याध्यक्ष श्री चांगदेवजी पवळे, श्री आदिनाथजी मदने, जेष्ठ नाभिक कार्यकर्ते श्री हनुमंतराव कोरडे, श्री लक्ष्मीकांत कोरडे व तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पदाधिकारी, हितचिंतक, प्रतिनिधी व नाभिक समाज बांधव मोठ्या प्रमाणावर आवर्जून उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आपल्या नाभिक समाजाचे नवनिर्वाचित सदस्य सौ.सुनिताताई सोमनाथ कोरडे ( लोणी ), सौ.कमलताई आप्पासाहेब हुडे ( तांभेरे ), सौ.हिराबाई दिपक चव्हाण ( उक्कडगाव ), श्री जगन्नाथजी कृष्णाजी सोनवणे ( एकरुखे ), सौ.तृप्ती विश्वासराव या विजयी सदस्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थी चि.शुभम कोरडे ( लोणी ) याने नुकतीच झालेल्या नीट परिक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल त्याचे देखील अभिनंदन व सत्कार करण्यात आला. राहुरी फॅक्टरी येथील नवनिर्वाचित अध्यक्ष मा.श्री विजयजी सोनवणे, उपाध्यक्ष मा.श्री सचिनजी वाघमारे, सलुन असोसिएशनचे अध्यक्ष मा.श्री महेशजी बिडवे, उपाध्यक्ष मा.श्री विकासजी साळुंखे यांना नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री मनोजभाऊ वाघ यांच्या शुभहस्ते पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सलुन असोसिएशनचे अध्यक्ष श्री महेशजी बिडवे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले. या समारंभात श्री अनिलजी वाघमारे, श्री गंगाधरजी पवळे, श्री संदीप साळुंखे, श्री बबलू गायकवाड, श्री अभिजितभाऊ आहेर, श्री महेशजी पवळे, श्री उद्धवजी राऊत, श्री विश्वनाथ राऊत, श्री सुदामजी पवळे, श्री दत्तात्रय राऊत, श्री भागवतजी कोरडे, श्री प्रकाश दुधाडे, श्री वेदांतजी विश्वासराव, श्री तुषारजी राऊत, श्री रविंद्र राऊत, श्री दादाजी दुधाडे, श्री श्रीकांतजी अनारसे, श्री नितीन सोनवणे, श्री सोमनाथजी आहेर व आदी समाज बांधव उपस्थित होते.

जय संत सेनाजी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *