
कोपरगाव प्रतिनिधी:-
राहुरी फॅक्टरी येथील प्रथितयश व्यापारी मारुती शंकर मोरे यांची कन्या कु. सायली मारुती मोरे हिची पुणे विद्यापीठ अंतर्गत जि आय एस (GIS) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्यातून या अभ्यासक्रमासाठी फक्त तीस जागा भरल्या जातात त्यामध्ये श्रीरामपूर येथील राव बहाद्दूर बोरावके महा विद्यालयातून निवड झालेली कु सायली ही एकमेव विद्यार्थीनी ठरली आहे. त्याबद्दल राहुरी अर्बन निधी संस्थेच्या वतीने सायली हीचे शाल व श्रीफळ देऊन अभिनंदन करताना नीलिमा होले, हमसिरा शेख, आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, राहुरी अर्बन चे संस्थापक चेअरमन रामभाऊ काळे, मारुती मोरे आदी.
