के. जे. सोमय्या महाविदयालयात माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांची जयंती साजरी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
स्थानिक के. जे. सोमय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालयात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे यांच्या हस्ते स्व. विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मा. अशोकराव रोहमारे म्हणाले की, स्व. विलासराव देशमुख हे मराठवाडा भागातील एक मातब्बर राजकीय नेतृत्व होते. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील जनतेची अतोनात सेवा केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय वाटचालित लोकनेते म्हणून ओळख निर्माण केली होती. आपल्या महाविदयालयाच्या शैक्षणिक जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. राजकीय परिपक्वता, उत्तम प्रशासकीय कौशल्य व जनसंपर्क या गुणांमुळे ते सदैव सर्वाच्या स्मरणात राहतील.
यावेळी संस्थेचे सचिव अॅड. संजीवदादा कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात स्व. विलासराव देशमुख यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी संस्थेचे विश्वस्त संदीपराव रोहमारे, महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस यादव यांच्या समवेत महाविदयालयातील सर्व प्राध्यापक व विदयार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *