शासकीय चित्रकला स्पर्धेचा गौतम पब्लिक स्कूलचा १०० % निकाल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कूलने एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.
महाराष्ट्र शासन एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट यांच्यावतीने एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शंभर टक्के यश संपादन केले आहे. या परीक्षेस विद्यालयातील एलिमेंटरी परीक्षेत ६० विद्यार्थी व इंटरमिजिएट परीक्षेत एकूण ७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी A श्रेणीमध्ये १३ विद्यार्थी, B श्रेणीमध्ये ३१ विद्यार्थी व C श्रेणी मध्ये ९५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. आ. अशोकरावजी काळे, ट्रस्टी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे, सर्व संस्था सदस्य व प्राचार्य नूर शेख यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना पर्यवेक्षिका ज्‍योती शेलार, सौ. सुनिता कुलकर्णी व कलाशिक्षक गोरक्ष चव्हाण यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *