कै.भागचंदजी ठोळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
शहरातील जेष्ठ नागरिक सेवा मंचचे संस्थापक अध्यक्ष कै भागचंदभाऊ ठोळे यांची आज पुण्यतिथी
२२मे २०१३ रोजी भाऊंचे निधन झाले आणि दातृत्वाचे एक पर्व अनंतात विलीन झाले कोपरगाव तालुक्यात भागचंद माणिकचंद या नावाला खूप महत्त्वाचे स्थान आहे शहरातील नामांकित शैक्षणिक संस्था श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय येथील अनेक विद्यार्थी नावारूपाला आले डॉक्टर्स इंजिनिअर उद्योजक आणि अभिनेते सुद्धा
रात्रीस खेळ चाले या मालिकेतील मुख्य पात्र आण्णा नाईक म्हणजे माधव अभ्यंकर हे सन १९७८ सालचे याच विद्यालयाचे विद्यार्थी
या शिवाय सिमेंट खते ठिबक सिंचन संच साबण आदि उद्योगात या फर्मने आपला ठसा उमटविला आहे
उपेक्षित वंचित समाजासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी सर्वतोपरी मदत ठोळे परीवाराने केलेली आहे
काही कुटुंबांमध्ये अडगळीच्या ठरणारे जेष्ठ नागरिक त्यांची अडचण गरज ओळखून कै भागचंदभाऊ ठोळे यांनी जेष्ठ नागरिक सेवा मंचची स्थापना केली त्या वेळी कै ऍड पि डी ( दादा) गुजराथी प्रा अमरनाथ लोंगानी सी आर भायभंग जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी कै सर्जेराव भोसले कै छोटुभाई जोबनपुत्रा( चाचा) विजय बंब उत्तमभाई शहा दत्तोपंत कंगले रजनीताई गुजराथी सुतारताई चंद्रकांतशेठ ठोळे आदिंचे सहकार्याने अनेक सामाजिक सेवाभावी उपक्रम राबविले शहर व तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गणवेश चपला बूट आदि प्रकारे मदत केली आहे
हाच वसा उद्योजक कैलास शेठ ठोळे राजेश शेठ ठोळे सौ सुधाभाभी ठोळे आणि परीवाराने चालविला आहे कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले असताना महापुरामुळे स्थलांतर केलेल्या कुटुंबांना ठोळे परीवाराने सदैव मदतीचा हात दिला आहे त्यांचे मानावे तेवढे आभार थोडेच आहे
कै भागचंदभाऊ ठोळे यांनी प्रवरा मेडिकल चे वतीने सर्व रोग निदान उपचार शिबिराचे आयोजन करून अनेक रूग्णांना दिलासा दिला आहे
अशा सेवाभावी भागचंदभाऊ ठोळे यांची पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
हेमचंद्र भवर कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *