मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने प्रसादनगर भागात नवीन अंगणवाडी सर्व्हेचे काम सुरू:- आप्पासाहेब ढुस…

Uncategorized

(राहुरी फॅक्टरी):-
महिला व बाल विकास राज्यमंत्री ना. बच्चूभाऊ कडू साहेब यांचे आदेशाने देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील प्रसादनगर भागात नवीन अंगणवाडी मंजुरी साठी जिल्हा महिला व बालविकास विभागाचे वतीने माहिती गोळा करनेचे काम सुरू झाले असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी दिली.
देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील प्रसादनगर (पश्चिम) च्या जवळपास दोन हजार लोकवस्ती असलेल्या अनधिकृत झोपडपट्टी भागातील नागरिकांची मागणी आणि तेथील लहान मुले, गर्भवती व स्तनदा माता यांचे प्रमाण लक्षात घेऊन या ठिकाणी नवीन अंगणवाडी अत्यंत गरजेची असल्याची बाब जिल्हाध्यक्ष अभिजितदादा पोटे यांचेसह आप्पासाहेब ढुस यांनी नुकत्याच मंत्रालयात ना. बच्चूभाऊ कडू यांचे सोबत झालेल्या बैठकीत निदर्शनास आणून दिली होती.
त्याच बैठकीत ना. बच्चूभाऊ कडू यांनी प्रसादनगर भागाचा सर्व्हे करून नवीन अंगणवाडीचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश अहमदनगर येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांना दिले.


त्यानुसार प्रसादनगर भागात नवीन अंगणवाडी मंजुरीसाठी सर्व्हे कारनेचे काम आज सुरू झाले असल्याची माहिती आप्पासाहेब ढुस यांनी दिली.
याच प्रसादनगर भागातील पिण्याच्या पाण्यापासून तब्बल चाळीस वर्षे वंचित राहिलेल्या साठ कुटुंबांना पिण्याच्या पाण्याचे नवीन नळ कनेक्शन मिळवून देण्याचे काम प्रहार चे वतीने नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढून नुकतेच करणेत आले होते. आज त्या साठ कुटुंबांना त्यांचे हक्काचे पाणी मिळाले असल्याने प्रहारच्या माध्यमातून लवकरच येथे नवीन अंगणवाडी मंजूर होईल असा विस्वास तेथील नागरिकांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *