
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुर्णाकृती पुतळे आहे.तसेच लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचेही कामकाज चालु आहे.तसेच राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊंचा पुर्णाकृती पुतळा नगरपरिषदेने बसवावा असे सकल मराठा समाजाच्या वतिने मागणी करण्यात आली आहे.सदरचे निवेदन नगरपरिषदेला नुकतेच देण्यात आले आहे.या निवेदनावर भरत मोरे,अनिल गायकवाड,बालाजी गोर्डे,विनय भगत,दिपक कराळे,अमित आढाव,भुषण पाटणकर,संदीप डुंबरे,गणेश जाधव यांच्या सह्या आहेत.सात दिवसात यासंदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.दि ८ /२/२०२१ रोजी कोपरगाव शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ उपोषण केले जाईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतिने देण्यात आला आहे.
