चांगल्या रस्त्यांशिवाय मतदार संघाचा विकास अशक्य:- आमदार आशुतोष काळे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा विकास साधण्यासाठी सर्वच रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे. मतदार संघातील सर्वच प्रमुख रस्ते दर्जेदार करण्यासाठी व प्रत्येक गावांना जोडणारे सुरक्षित आणि चांगले रस्ते निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून चांगल्या रस्त्यांशिवाय मतदार संघाचा विकास अशक्य असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

         कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर येथे सन २०२०-२१ जिल्हा नियोजन योजनेअंतर्गत ४३.४६ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या मुर्शतपुर फाटा ते मुर्शतपुर गाव रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत ३ लक्ष निधीतून मुर्शतपुर ते टाकळी शिव रस्ता मुरुमीकरण कामाचे भूमिपूजन नुकतेच आमदार आशुतोष काळे यांच्या शुभहस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की, दळणवळणाच्या दृष्टीने नागरिकांना चांगल्या दर्जाची रस्ते उपलब्ध करून देण्यावर भर देत आहे. मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संकटाचे आवाहन असतांना रस्त्यांसाठी निधी मिळाला आहे. मतदार संघातील अनेक रस्त्यांचे प्रस्ताव शासनदरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोना संकट कमी कसे होईल यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करीत तरीदेखील प्रत्येक नागरिकांनी आपली सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारी समजून सर्वांनी कोरोना संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले.

यावेळी पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक हरिभाऊ शिंदे, राहुल जगधने, सरपंच सौ. साधनाताई दवंगे, उपसरपंच सौ. मनिषाताई गिरमे, अनिल दवंगे, विष्णु शिंदे, नितीन शिंदे, रोहिदास मोरे, संदीप बारवकर, प्रविण गुंजाळ, सुनील गिरमे, आण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब शिंदे, हारुणभाई शेख, रामदास केकाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत वाकचौरे, दिलीप गाडे, ग्रामसेवक राजपूत, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ – मुर्शतपुर येथे रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन प्रसंगी आमदार आशुतोष काळे व मान्यवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *