
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्याला प्राचिन काळापासून गोदातीरावरील वसलेले संत-महंतांची महती आहे.येथे असलेल्या परंपरा आणि सांस्कृतिक वारसा टिकवण्याचे भाग्य लागते. कला आणि सांस्कृतिक कार्य मनापासून टिकवण्यात वामन घोलप सारखे कलाकारांचे मनस्वी योगदान समाधान देणारे असल्याचे मनोगत सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांनी व्यक्त केले.

कोपरगाव नगरीवर गीतकार वामन घोलप यांनी रचना तयार करुन तीचे लोकार्पण करण्यात आले आहे.या रचनेचा सर्व प्रवासाचे वर्णन करण्यासाठी वामन घोलप यांनी सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांची सदिच्छा भेट घेतली आहे.

भारतीय प्रजासत्ताक वर्धापन दिनी संत रमेशगिरी महाराज यांचे शुभहस्ते या चित्रबद्ध गीतांचे लोकार्पण झाले आहे.
याप्रसंगी गीतकार वामन घोलप यांचे कौतुक करतांना सुशांत घोडके म्हणाले, पेशवाईच्या काळात बाजीराव पेशवे यांचे समोर शाहीर परशूराम यांनी कोपरगाव नगरीवर रचना सादर केली होती.शाहीर परशूरामचे तोंडून कोपरगांवची महती ऐकून बाजीराव पेशवे यांनाही पुण्यधाम कोपरगाव नगरीत वास्तव्याचे आत्मिक समाधान व्यक्त केले होते. दोन शतका नंतर कोपरगावचे सुंदर वर्णन वामन घोलप यांचे गीत रचनेतून ऐकावयास मिळते.कोपरगावात निस्वार्थ सांस्कृतिक वारसा टिकवण्यासाठी फार मोठा राजाश्रय मिळत नाही. चुकुन राजाश्रय मिळालाच तरी त्यांचा अजेंडा आणि झेंडा मिरवावा लागतो.कोपरगांव तालुक्यात नाट्य-सांस्कृतिक कार्यक्रमास व मनोरंजनाचे केंद्रही नाही.त्या करिता कोणी किती प्रामाणिक प्रयत्न केले हा विषय आपला नसून स्वतंत्र विषय आहे.या सर्व बाबी कोपरगाव सांस्कृतिक चळवळीला उतरणीला नेणार्या असून कोणी या कामात लक्ष घालून काम करेल.अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपणच नटराजाच्या सेवेत तप्तर राहुन कलासक्त,कला प्रेमी एकत्र येऊन कोणी काय घालवलं यावर अनावश्यक चर्चा करण्यापेक्षा आपल्या हातून जे शक्य आहे ते टिकवण्यासाठी प्रयत्न करुया.कोपरगांवची खरी ओळख आणि सांस्कृतिक चळवळीत तटस्थपणे गावकरी म्हणून काम करण्याची गरज आहे.कारण हे टिकवायलाही भाग्य लागते.असा आशावाद व्यक्त केला.
वामन घोलप हे सर्वसामान्य रिक्षा चालक आहे.ते येसगांव वास्तव्य करतात.दिव्यांग असूनही रिक्षा चालवून मिळालेल्या उत्पन्नातून काही रक्कम चित्रपट कलेची हौस भागविण्यासाठी १४ वर्षांपासून खर्च करतात.
त्यांनी मराठी चित्रपटात कथा, पटकथा आणि गीत रचना लिहिल्या आहेत.त्यापैकी कन्यारत्न, टोपीवाले कावळे,एकावर एक असे त्यांचे चित्रपट आहे.
कोरोना संसर्ग प्रतिबंध लाॅकडाऊन काळात त्यांनी कोपरगाव शहरावर शब्दरचना रचना केली आहे.त्याचे चित्रकरण कोपरगावात झाले.चित्रपटातील गाण्यासाठी लागणारी सर्व दर्जेदार तांत्रिक व तंत्रज्ञ मदत घेतली. कोपरगावातील जोपासलेल्या प्राचिन परंपरेचे जतन होवून त्याची ख्याती सर्वदूर व्हावी या भावनेतून कोपरगाववर गीत रचना तयार केली आहे.
कलेचे उत्तम जाणकार म्हणून सुशांत घोडके यांची गीतकार वामन घोलप यांनी सदिच्छा भेट घेतली.याप्रसंगी एक सर्वसामान्य रिक्षा चालक चित्रपट सारख्यक्षेत्रात योगदान देतो.हे पाहून सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांनी त्याचे कौतुक करत त्याचा सन्मान केला आहे.
केवळ कोपरगावच्या प्रेमापोटी स्वकष्टाचे हजारो रुपये एका सर्वसामान्य कलाप्रेमी रिक्षावाल्याने कोपरगांव शहराच्या गीत रचनेवर खर्च केले आहे.त्या बद्दल कोपरगाव शहरातील अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.
