पुरोगामी विचारांची ना.आशुतोष काळेंकडून जपणूक देर्डे चांदवड सोसायटीच्या चेअरमनपदी दिली मागासवर्गीय समाजाला संधी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- फुले,शाहू,आंबेडकरांच्या विचारांवर वाटचाल करीत असल्याचे प्रत्येक पक्षाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार अमलात आणतात का? हा संशोधनाचा विषय असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मात्र हा विचार जपला आहे. पक्षाच्या ध्येय धोरणांचे तंतोतंत पालन करीत असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने नामदार आशुतोष काळे यांनी देखील फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची जपणूक करतांना कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड सोसायटीच्या चेअरमन पदी मागासवर्गीय व्यक्ती विष्णूपंत विघे यांना संधी देऊन व्हा.चेअरमन पदावर देखील अल्पसंख्याक समाजाचे सचिन मेहत्रे यांची निवड करून त्यांच्या हाती सोसायटीचा कारभार सोपवला आहे.

कोपरगाव तालुक्यातील देर्डे चांदवड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली काळे गटाने कोल्हे गटाच्या सत्तेला सुरुंग लावून सोसायटीची सत्ता हस्तगत करून १२ हि जागा मोठ्या मताधिक्क्याने जिंकल्या आहेत. या सोसायटीच्या चेअरमन, व्हा चेअरमनपदाची निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत ना. आशुतोष काळे यांनी मागासवर्गीय समाजाला न्याय देवून चेअरमन पदावर काळे गटाच्या विष्णुपंत विघे यांना संधी दिली तर व्हा.चेअरमनपदी देखील अल्पसंख्याक समाजाला संधी देत सचिन मेहेत्रे यांची वर्णी लागली आहे.
पार पडलेल्या निवडणुकीत चेअरमन, व्हा चेअरमनपदाच्या निवडणुकीत चेअरमनपदासाठी विष्णूपंत रंगनाथ विघे यांच्या नावाची सूचना दादासाहेब शितोळे यांनी मांडली. सदर सूचनेला ज्ञानदेव होन यांनी अनुमोदन दिले. व्हा चेअरमनपदासाठी सचिन शांताराम मेहेत्रे यांच्या नावाची सूचना भाऊसाहेब होन यांनी मांडली. त्या सूचनेला बबनराव कोल्हे यांनी अनुमोदन दिले. चेअरमन, व्हा चेअरमनपदासाठी अनुक्रमे विष्णू विघे व सचिन मेहेत्रे यांचे एकमेव अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी आर. एस. जोशी यांनी चेअरमनपदी विष्णू विघे व व्हा चेअरमनपदी सचिन मेहेत्रे यांची निवड झाल्याचे जाहीर केले. निवडणूक कामी सोसायटीचे सचिव हेमंत मोकळ यांनी सहकार्य केले. यावेळी नूतन संचालक भाऊसाहेब कोल्हे, दादासाहेब शितोळे, शिवाजी होन, सतीश गुंड, बबन कोल्हे, ज्ञानदेव होन, भाऊसाहेब होन, प्रभाकर कोल्हे, सौ. मनीषा सुभाष कोल्हे, सौ. सुनिता संजय कोल्हे तसेच बाबुराव कोल्हे, चांगदेव होन, पोपटराव गुंड, पोपट कोल्हे, राजेंद्र कोल्हे, सुभाष कोल्हे, राजेंद्र होन , विठ्ठल कोल्हे, संजय कोल्हे, अशोकराव होन, प्रीतम मेहेत्रे आदी मान्यवरांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे माजी आमदार अशोकराव काळे व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले असून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच नूतन संचालक मंडळ व सर्व कार्यकर्त्यांनी एकविचाराने चेअरमनपदासाठी मागासवर्गीय समाजाला काम करण्याची दिलेली संधी कौतुकास्पद असल्याचे सांगत सर्व कार्यकर्त्यांचे देखील कौतूक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *