पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन ही भारतीय संगीतक्षेत्राची मोठी हानी संगीत क्षेत्रात कधीही न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे:- मंत्री छगन भुजबळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे दुःखद निधन झाले. ‘संतूर’ या वादनातून कोट्यवधी संगीतरसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं होत. विशेषतः काश्मिरी लोकवाद्य असलेल्या ‘संतूर’ वादनाने संगीत विश्वाला नवा आयाम त्यांनी मिळवून दिला. पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन ही भारतीय संगीतक्षेत्राची मोठी हानी असून, भारतीय संगीत क्षेत्रात कधीही न भरून निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मी व माझे कुटुंबीय पंडितजींच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.
भावपूर्ण श्रद्धांजली !
छगन भुजबळ,मंत्री, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *