
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्याला ऐतिहासिक पौराणिक धार्मिक साहित्यिक सांस्कृतिक वैचारिक राजकीय संपन्न वारसा लाभला आहे
आजतागायत या तालुक्याने अनेक स्थित्यंतरे पाहिली येथे वास्तव्यास असलेल्या महान व्यक्तीमत्वांनी आपला एक आगळा वेगळा ठसा उमटविला आहे
शैक्षणिक क्षेत्रात कोपरगाव तालुका मागे नाही आज संजीवनी समता ओम गुरुदेव( आत्मा मालीक) रेनबो शारदा इत्यादी शैक्षणिक संकुलात अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु गेल्या तीस चाळीस वर्षांपूर्वी नावाजलेल्या श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात अनेक विद्यार्थी शिक्षण घेऊन परदेशस्थ झाले आहेत येथील विद्यार्थी साहित्य कला सांस्कृतिक वैद्यकीय नाट्य आदि क्षेत्रात नामवंत झाले आहेत

पैकी सध्या दूरदर्शन मालिका मधे गाजलेली मालीका – रात्रीस खेळ चाले-या मालिकेतील मुख्य पात्र म्हणजे – आण्णा नाईक – होय
हे आण्णा नाईक म्हणजे माधव अभ्यंकर
माधव अभ्यंकर १९७८ साली श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात ब तुकडीत शिक्षण घेत होते तर निवासस्थान पिंपल्स बॅंकेसमोरचे वाड्यात होते
कोपरगाव शहरात लायन्स क्लब आयोजित एक्स्पो कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी आपल्या शाळेला भेट दिली त्यावेळी ते जून्या आठवणींनी भाराऊन गेले त्या वेळचे शिक्षक मित्रपरिवार आणि शाळेत घडलेल्या गमतीजमती सांगितल्या
मुख्याध्यापक मकरंद कोरहाळकर संस्थेचे अध्यक्ष कैलास शेठ ठोळे दिलीपशेठ अजमेरे डॉ अजमेरे यांनी त्यांचे स्वागत केले त्यांच्या समवेत सुधिर डागा एस पी कुलकर्णी नरेंद्र कुर्लेकर आदि समकालीन मित्र उपस्थित होते
एवढा मोठा महान नाटयकलावंत या विद्यालयाचा विद्यार्थी म्हणून अभिमान वाटतो आहे
अस म्हणतात – या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतूनी चैतन्य गावे कोणती पुण्य येती फळाला जोंधळयाला चांदणे लगडून जावे
ज्या वेळी माधव अभ्यंकर शिक्षण घेत होते त्या वेळी मुख्याध्यापक श्री कोरहाळकर होते आणि आजही त्याच नामे मुख्याध्यापक आहेत हे विशेष
या अविस्मरणीय भेटी प्रसंगी शाळेचे सहशिक्षक सहशिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माधव अभ्यंकर ( आण्णा नाईक) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले जून्या आठवणींना उजाळा दिला
रात्रीस खेळ चाले पण तेव्हा दिवसा खेळ कसा चालायचा हे गमतीने सांगितले
आण्णा नाईक ( माधव अभ्यंकर) यांच्या कलेला लाख लाख सलाम
भावि नाट्यकलेस शुभेच्छा
