सोनारी-रवंदेच्या नागरिकांची रस्त्याची समस्या कायमची सुटलीसोनारी-रवंदेच्या नागरिकांनी मानले आ. आशुतोष काळेंचे आभार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव मतदार संघातील सोनारी-रवंदे हा जवळपास चार किलोमीटरच रस्ता सोनारीच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा रस्ता. सोनारीच्या नागरिकांचा दैनंदिन सपर्क रवंदे गावाशी आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच आठवडे बाजार, तलाठी कार्यालय, जिल्हा बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशु वैद्यकीय केंद्र तसेच कापूस व टोमॅटो खरेदी होत असल्यामुळे सोनारीच्या शेतकऱ्यांचा देखील दैनंदिन सपर्क येत असे परंतु या पाच किलोमीटर रस्त्यांपैकी एक किलोमीटर रस्त्याचे काम माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात व आ. आशुतोष काळे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एक किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले होते व उर्वरित रस्त्याचे काम मात्र झालेले नव्हते. त्याबाबत सोनारीच्या नागरिकांनी या रस्त्यामुळे होणाऱ्या त्रासाचा पाढा आ. आशुतोष काळे यांच्यापुढे वाचला होता. नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी या सोनारी-रवंदे रस्त्याला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत २ कोटी ३८ लक्ष रुपये निधी दिला आहे.
शनिवार (दि.२५) रोजी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामास आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते भूमिपूजन करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी सोनारीच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून मागील अनेक वर्षाचा प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न कायमचा सोडविल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले. तसेच या रस्त्याला रवंदेच्या अनेक शेतकऱ्यांची शेती असल्यामुळे त्यांना देखील पावसाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यांचा देखील प्रश्न सुटला आहे. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता चांगल्या दर्जाची राहील याची काळजी घेवून वर्षानुवर्ष रस्ता टिकला पाहिजे याची खबरदारी घ्या अशा सूचना ठेकेदार व सोनारी-रवंदेच्या ग्रामस्थांना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.
याप्रंसगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिन्द्रजी बर्डे, संचालक अनिलजी कदम, माजी संचालक ज्ञानदेव मांजरे, अरुणजी चंद्रे, अशोकराव काळे, साहेबराव कदम, पंढरीनाथ काळे, माजी सरपंच गोरख दवंगे, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे संचालक महेंद्र काळे, विलास दवंगे, सुधीर कदम, सुदामराव भुसे, संजय कदम, सुभाष दवंगे, नवनाथ भुसे, दत्तू कदम, सर्जेराव घायतडकर, गणेश घायतडकर, उत्तम भुसे, तान्हाजी कदम, प्रविण आहेर, विजय दवंगे, सुनील काळे, सोपानराव मढवई, आण्णा मोरे, काशिनाथ कंक्राळे, दिलीप घायतडकर, शिवाजी वाघ, उत्तमराव कदम, बाळासाहेब पवार, जयवंत कदम, राजेंद्र कदम, चंद्रकांत खिलारी, निलेश इंगळे, सागर पवार, निलेश उराडे, तुळशीराम घायतडकर, चंद्रकांत कंक्राळे, मच्छिन्द्र घायतडकर, साईनाथ काळे, विशाल मोरे, भोला जगदाळे, कृष्णा घायतडकर, शिवाजी कदम, अविनाश नाईक, विलास कंक्राळे, अशोक गोऱ्हे, शांताराम सांगळे, बाबासाहेब सांगळे, अमोल केकाण, भाऊसाहेब सांगळे, रविंद्र घुगे, विनोद सांगळे, गणपत सोनवणे, परशुराम घुगे, संपत अलगट, मारुती दराडे, नारायण कुटे, वसंतराव सांगळे, संदीप सांगळे, तान्हाजी आघाव, रविंद्र आघाव, मोहन सोनवणे, अर्जुन शेलार, तुकाराम घुगे, कैलास कुटे, विष्णु घुगे, बाळासाहेब वाघ, मधुकर आव्हाड, संजय आव्हाड, दगडू सांगळे, शिवाजी दराडे, मधुकर आव्हाड, बाळासाहेब केकाण, बाबासाहेब केकाण, बाबुराव गाडेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ – सोनारी-रवंदे रस्त्याचे भूमिपूजन प्रसंगी आ. आशुतोष काळे व मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *