आमच्या सरांना, भावपूर्ण श्रद्धांजली :- नारायणशेठ अग्रवाल…

Uncategorized

के.जे.सोमय्या कॉलेजचे नाव काढतात पहिले आठवण येते ती स्व.प्राध्यापक.गो.ग वर्पे सर त्याचे दोन-तीन दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले भावपूर्ण श्रद्धांजली…!
स्व.वर्पे सर राज्यशास्त्र व अर्थशास्त्र चे प्राध्यापक. कॉलेज असताना दोन वर्ष मला त्यांचे मार्गदर्शन मिळाले मी खूप भाग्यवान आहे. राज्यशास्त्राचे शिक्षण देताना केवळ पाठ्यपुस्तक हेच त्यांचा शस्त्र नव्हत प्रत्यक्ष अनुभव व व्यवहार यांची जोड घालून ते हा विषय शिकवत अत्यंत सोप्या व सुटसूटीत भाषेत ते प्रत्येक विषय समजून सांगत.मागणी व पुरवठा मार्केटचा अर्थशास्त्र ते अनेक उदाहरणं देऊन विद्यार्थ्यांना पटवून सांगत. एकाच शब्दाचे अनेक उच्चार…….. परत त्यांना अस सांगायच होत……… त्यांना अस प्रतिपादन करायचं होत……. त्यांचा अस मत होत……. असे अनेक वाक्यांनी तो विषय समजून सांगत,त्यातला एक शब्दही परीक्षेला आठवला पूर्ण उत्तर लगेच लक्षात येत होत.
त्यांच्या विनोदी स्वभावाने वर्गात एकदम उत्साहवर्धक वातावरण असायचे त्यांचे विद्यार्थी नसतानाही त्यांच्या वर्गात येऊन बसत स्व. प्राध्यापक.वर्पे म्हणजे ज्ञानपीठाचे चालते बोलते व्यासपीठ,
त्यांचे सुपुत्र श्री.संदीपजी वर्पे आज महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय नेत्यात आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. डॉक्टर अनिकेत वर्पे व समीर वर्पे ही मुले सुद्धा आज समाजकार्यात पुढे आहे. त्यांच्या मिसेस (पद्मा बोटे) या सुद्धा आदर्श शिक्षिका आहे.
स्व.वर्पे सरांनी दिलेले शिक्षण आजही व्यवहारात उपयोगी ठरते. अशा आमच्या सरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना मनात अत्यंत दुःख निर्माण होते. सरांना भावपूर्ण श्रद्धांजली….!

आपला एक विद्यार्थी
नारायण अग्रवाल,कोपरगाव.
मो.9822630330

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *