
कोपरगाव प्रतिनिधी:-
याबाबत सविस्तर वृत्त असे की दि. २२/४/२०२२ ते २८/४/२०२२ या काळात गुरुचरित्र ,नवनाथ ,भागवत , दुर्गा सप्तशती , मल्हारी सप्तशती , श्रीपाद श्रीवल्लभ ,व भगवदगीता आदि पारायन श्री स्वामी समर्थ व अध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र कारवाडी (शहा) ता. सिन्नर याठिकाणी उत्साहात करण्यात आले.यज्ञामधे दररोज विविध प्रकारचे यज्ञ, याग, स्वाहाकार करण्यात आले..


तसेच दररोज त्रिकाळ आरती व सायंकाळी विविध सेवकरी मार्गदर्शन करण्यात आले. व सातही दिवस दुपारी १२ते सायंकाळी ५ दरम्यान वास्तुशास्र ,यज्ञ ,हस्तशास्र ,पंचोपचार , षोडशोपचार, नवचंडी, पंचाग ,विविध प्रकराचे प्रशिक्षण देण्यात आले.कार्यक्रमामध्ये अनेक तरुण मुला मुलींनी आदरणीय संतोष भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेऊन आनंदाने आपली सेवा रुजू केली.तसेच २३मे ते ३१मे २०२२ सकाळी ७ ते १० या वेळेमध्ये मुलांना बाल संस्कार शिबिर आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्यामध्ये मुलांचा अभ्यास लक्षात न राहणे, मुलांचा हट्टीपणा ,मुलांना शारीरिक व बुद्धीचा मंत्र स्तोत्रांचे वाचन , योगा , ध्यान , धारणा, प्राणायाम शिकवण्यात येणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्र प्रमुख- आदरणीय संतोष भाऊ जाधव
अण्णा भाऊ फरताळे
बाळू काका जाधव
देविदास आबा जाधव
देविदास यादव जाधव
भगवान भाऊ सैंदर
भाऊसाहेब गंगाधर जाधव
भागवत भाऊ कांदळकर
आप्पा भाऊ घुमरे
आनंद भाऊ आव्हाड
मंगेश जाधव यांनी परिश्रम घेतले आहे.
मराठा विकास फौंऊडेशन ट्रस्ट चे अध्यक्ष राहुल (ज्ञानेश्वर) आढाव उपाध्यक्ष संतोष पेकळे, सचिव संतोष कुटे , खजिनदार कमलेश जाधव , सदस्य अनिल शिंदे , शशिकांत दवंगे, सचिन शेळके, राहुल गायकवाड,शशिकांत गायकवाड, आनंद गोडसे, एकनाथ लामखडे, धनराज राऊत संदीप (बॉबी) आहेर,सोमनाथ ढवळे.यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने हजर होते.याप्रसंगी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.

