
कोपरगांव प्रतिनिधी:- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमीत्त सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री गुरूचरित्र पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते त्याची सांगता जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे व सौ. रेणुकाताई कोल्हे या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक अरूणराव येवले, साहेबराव कदम, सोपानराव पानगव्हाणे, शिवाजीराव वक्ते, राजेंद्र कोळपे, प्रदिप नवले, ज्ञानेश्वर परजणे, फकिरराव बोरनारे, मनेष गाडे, मनोहर शिंदे, वेणुनाथ बोळीज, बाळासाहेब वक्ते, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, एच. आर . मॅनेजर प्रदिप गुरव, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, सर्व आजी माजी संचालक, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख कार्यकर्ते, स्वामी समर्थ सेवेकरी, मोठया संख्येने उपस्थित होते. ६६ पारायणार्थी पारायणांस बसले होते.
