शिंगणापूर, धारणगाव, जेऊर पाटोदा, हिंगणी, चांदगव्हान, मुर्शतपूरच्या पाणी पुरवठा योजनांना ६५ कोटीची प्रशासकीय मंजुरी:- ना. आशुतोष काळे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील नागरिकांना विशेषत: महिला भगिनींना होत असलेल्या पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेवून अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे अनके गावांची अडचण कायमची सुटली असली तरी काही गावांच्या पाणी योजनांना अडचणी येत असल्यामुळे हि गावे प्रतीक्षेत होती. त्याबाबत ना. आशुतोष काळे यांनी या अडचणी दूर करून केलेल्या पाठपुराव्यातून या गावांचा देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळाले असून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत या गावांच्या पाणी पुरवठा योजनांना ६५ कोटी १० लाख रुपयांची प्रशाकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न प्रलंबित होता. त्यामुळे नागरिकांना व महिला भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. नागरिकांना देखील महिलांच्या बरोबरीने पाणी आणण्यासाठी पायपीठ करावी लागत होती. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी अडीच वर्षात अनेक गावांचा पिण्याच्या प्रश्न मार्गी लावतांना केलेल्या प्रयत्नातून आजवर ९५ कोटीचा निधी पाणी पुरवठा योजनांसाठी आणला आहे. परंतु काही गावातील पाणी पुरवठा योजनांमध्ये अडचणी येत असल्यामुळे या गावांच्या पाणी पुरवठा योजनांना निधी मिळावा यासाठी ना. आशुतोष काळे प्रयत्न करीत होते. त्या प्रयत्नांची महाविकास आघाडी सरकारने दखल घेवून शिंगणापूरच्या पाणी पुरवठा योजनेसाठी ३५ कोटी ४७ लक्ष व धारणगाव तसेच जेऊर पाटोदा, हिंगणी, चांदगव्हान व मुर्शतपूर या पाच गावांसाठी २९ कोटी ६२ लक्ष अस एकूण ६५ कोटी १० लक्ष निधीस प्रशासकीय मंजुरी दिली आहे. लवकरच या कामांच्या निविदा प्रसिद्ध होवून पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या या गावांची तहान भागविण्यात ना. आशुतोष काळे यांना यश मिळाले असून महिलांची पाण्यासाठी नागरिकांची होणारी भटकंती कायमची थांबली जाणार आहे. त्यामुळे या गावातील सर्व नागरिकांनी विशेषत: महिला भगिनींनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील या सहा गावांच्या पाणी पुरवठा योजनांना ६५ कोटी १० लक्ष रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिल्याबद्दल दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री ना. हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद अध्यक्षा ना. सौ. राजश्रीताई घुले यांचे ना. आशुतोष काळे यांनी या गावातील नागरिकांच्या वतीने आभार मानले आहे.
ना. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून अडीच वर्षात पाणी प्रश्नासाठी ३४६ कोटी मिळाले……
चौकट :- पाणी पिण्याचे असो की सिंचनाचे, पाणी प्रश्न आणि काळे परिवार यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे त्यामुळे पाणी प्रश्न आणि काळे परिवार हे जणूकाही समीकरण बनले आहे. कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी जीवनातील शेवटच्या श्वासापर्यंत पाण्यासाठी लढा दिला. त्यांचा वारसा पुढे माजी आमदार अशोकराव काळे यांनी चालविला आहे. मागील अडीच वर्षाच्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ना. आशुतोष काळे यांनी आजपर्यंत ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांना तब्बल १६० कोटी, कोपरगाव शहराच्या ५ नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१ कोटी व गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी ३०० कोटीची मंजुरी मिळवून आजपर्यंत ५५ कोटी रुपये मिळविले आहे. असे एकूण ३४६ कोटी रुपये पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी ना. आशुतोष काळे काळे यांनी आणले असून ना. आशुतोष काळे आपल्या परिवाराचा वारसा समर्थपणे पुढे चालवित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *