महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते आणि सुप्रदा फातर्पेकर यांनी मरीन ड्राईव्ह वसतिगृहातील पिडीत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रूपवते आणि सुप्रदा फातर्पेकर यांनी मरीन ड्राईव्ह वसतिगृहातील पिडीत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. आयोग त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास त्यांना दिला. मरीन लाईन्स पोलीस स्टेशनला भेट देत तपास कामाबाबत माहिती घेतली.


तसेच होस्टेलची पाहणी करत संचालकांची, व्यवस्थापनाची भेट घेतली. या संपूर्ण भेटीत अनेक त्रुटी आणि प्रशासकीय उणीवा लक्षात आल्या आहेत. होस्टेलवरचे सीसीटीव्ही गेले वर्षभर काम करत नाहीयेत, मनुष्यबळाची कमतरता आहे, महिला सुरक्षा रक्षक नाही, मुलींना तक्रार करण्यास पेटी किंवा कुठलाही संपर्क क्रमांक देण्यात आलेला नाही, होस्टेलच्या अधीक्षकांकडे अतिरिक्त कार्यभार आहे. या सोबतच पिडीतेने याआधी सुद्धा आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं होतं पण कुठलीच कारवाई केली गेली नाही असा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासर्व बाबींची सखोल चौकशी केली गेली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *