

कोपरगाव प्रतिनिधी:-
डॉ. श्री नानासाहेव धर्माधिकारी प्रतिष्ठाण यांच्या वतीने कोपरगांव शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे ६ टन कचरा गोळा करून झाडूने परीसर स्वच्छ केला. तसेच वाळलेले गवत व काटे कुसड, पावडे व दतळाच्या सहाय्याने काढण्यात आल्या. हा ओला व सुका घन कचरा एका जागी गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. या अभियानात कोपरगांव तालुक्यातील तसेच साकुरी येथील ७० श्री सदस्यांनी सहभाग नोंदविला.
डॉ. श्री नानासाहेव धर्माधिकारी प्रतिष्ठाणतर्फे अहमदनगर जिल्हयात विविध उपक्रम सुरू आहे. त्यापैकी रविवारी कोपरगांव येथे बस स्थानक व ग्रामीण रुग्णालय स्वच्छता अभियान उपक्रम राबविण्यात आला. एक सुदृढ व भारताचे नागरीक घडविण्याचे कार्य महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी निरूपणाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य सुरू केले. अत्यंत मेहनतीने, हिमतीने समाज व त्यातील मनुष्य चांगल्या विचारात राहावेत, म्हणून आपले आयुष्य परोपकारासाठी वेचले अध्यात्मातून समाज प्रबोधनाची चळवळ सुरू करून सर्व समाजातील धर्मातील माणसांना सोबत घेऊन आपल्याला समाजाचे, देशाचे मानवाचे काही देणे लागत आहे त्यांच्या ऋणातुन मुक्त व्हायचे आहे, असे उत्तम विचार देत कार्य करत राहिले. त्यांच्या नंतर हा वारसा नानासाहेन धर्माधिकारी यांची प्रेरणा घेत पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू ठेवली. हे समाजाभिमूख प्रतिष्ठान असून सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने व मानव जातीच्या कल्याणार्थ विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने करीत आहे. स्वच्छता अभियान, साक्षरता अभियान, आरोग्य शिवीर, वृक्षारोपण व संवर्धन, रक्तदान शिबीर, जलपुनर्भरण, नोकरी तथा व्यवसाय मार्गदर्शन तसेच कब्रस्थान, दफनभूमी, अमरधाम असे ३५ ते ३६ विविध सामाजिक, समाजोपयोगी व प्रबोधनपर उपकम प्रतिष्ठान मार्फत राबविले जातात. या सर्व समाजोपयोगी कार्यातून मानवता धर्माची शिकवण व देशातील मनुष्याला एकात्मतेचे दर्शन होत आहे.
प्रतिष्ठाणच्या या स्वच्छता अभियानात बसस्थानकाचे लेखाकार श्री मिलिंद कोपरे , वाहतूक निरीक्षक श्री अमित हम्पे, लिपिक श्री विशाल गुंजाळ, ग्रामीण रुग्णालयाचे श्री सुजय मगरे , श्री आनंद पाटील, श्री सचिन जोशी, श्री रामेश्वर इंगळे, श्री योगेश कोळी, श्री विजय शिरसाठ, श्री उत्तम म्हस्के, श्री संदीप लालबेग
तसेच पदाधीकारी व बांधव सहभागी झाले होते. नगरपालीकंकडून घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील नागरिकांनी या मोहिमेचे कौतुक केले.
