
कोपरगाव प्रतिनिधी:-
दि. 22/4/2022 रोजि एक निराधार मानसिक आजारी असलेलि मुलगि शिर्डी येथे बेवारस मिळून आली उन्हात एका रस्त्याच्या कडेला त्रस्त होऊन बसली होती तेव्हा तेथील काही लोकांनी तिची विचारपूस केली व तिला शिर्डी पोलीसस्टेशन येथे दाखल करण्यात आले


पोलिसांनी माणुसकीच्या नात्याने तिला चहा नाश्ता देऊन विचारपूस केली असता ती गोवा राज्यातील असून जिल्हा पणजी व गाव आमगाव येथील असे तिचे नाव अंजली अनिल पोपकर असे समजले परंतु नातेवाईकांचा कुठलाही संपर्क झाला नाही तेव्हा शेवटी तिला साईआश्रया परिवारात दाखल करण्याचा निर्णय घेतला तिला साईआश्रयात आणल्यानंतर प्रथम भोजन देण्यात आले व आपल्या सारखेच शेकडो बहीण भाऊ बघितल्या नंतर थोडीशी स्थिर झाल्याची दिसून येत होती तिची ट्रीटमेंट सुरु करून लवकरच साईबाबांच्या कृपेनें ति बरी होईल अशी खात्री वाटते तेव्हा मुलीला साईआश्रयात हक्काचे घर व मायेचा आधार मिळाला आहे पण तिला शिर्डीत का सोडले ? कुणी सोडले ? खरच माणुसकी हरवलीय का ? आपल्याच रक्ताला का वाऱ्यावर सोडतात ? माणूस इतका खालच्या थराला का गेला ? हे सर्व प्रश्न आपल्या सर्वांना आहेत तेव्हा या मुलीचे नातेवाईक मिळून यावे या साठी आपण ही पोस्ट शेअर करावी असे वाटते व काही माहिती मिळाल्यास लगेच या नंबर वर संपर्क करावा
ओम साई राम
साईसेवक:- गणेश दळवी
मो – 9637549300
